यावर्षीपासून अमेरिकेत मेजर लीग क्रिकेट ही टी-20 क्रिकेट स्पर्धा सुरू झाली आहे. शनिवारी (15 जुलै) सॅन फ्रांसिस्को युनिकॉर्न आणि सिएटल ओर्कास यांच्यात रंगतदार सामना चाहत्यांना पाहायला मिळाला. सिएटल ओर्कास संघाने 35 धावांनी विजय मिळवला असून एक विकेट चर्चेचा विषय ठरली. न्यूझीलंडचा फिन एलन या मेजर लीगमध्ये सॅन फ्रांसिस्को संघासाठी खेलत आहे. शनिवारी त्याने ज्या पद्धतीने विकेट गमावली, त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
सॅन फ्रांसिस्को युनिकॉर्न संघाला या सामन्यात जिंकण्यासाठी 178 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे त्यांना गाठता आले नाही. सिएटल ओर्कास संघाने प्रथम फलंदाजी करताना 4 विकेट्सच्या नुकसानावर 177 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात सॅन फ्रांसिस्को संघ 17.5 षटकात 142 धावा करून सर्वबाद झाला. सॅन फ्रांसिस्कोच्या डावातील चौथ्या षटकात फिन एलन खेळपट्टीवर अगदी निवांतपणे धावत होता. पण तितक्यात क्षेत्ररक्षकाने संधी साधली आणि एलनला तंबूत धाडले.
चौथ्या षटकाती दुसऱ्या चेंडूवर त्याने हलक्या हाताने लेग साईडला खेळला. या शॉटवर एक धाव घेण्यासाठी दोन्ही फलंदाज धावतात. पण क्षेत्ररक्षकाने संधीचे सोने केले आणि नॉन स्ट्राईक एंडवर त्याला धावबाद केले. एलन जरी संथगतीने धावात असला, तरी तो वेळेत क्रीजवर पोहोचू शकत होता. मात्र, क्रीजपासून काही अंतरावर त्याची बॅट खेळपट्टीत अडकून बसली आणि त्यामुळेच फलंदाजाला विकेट देखील गमवावी लागली. कॅमेरून गॅनन (Cameron Gannon) त्यावेळी गोलंदाजी करत होता.
WHAT JUST HAPPENED⁉️
Was this the only way Finn Allen could get out tonight?
HEADS-UP play and a BEAUTIFUL throw from Shehan Jayasuriya!
4⃣2⃣/1⃣ (3.2) pic.twitter.com/GZk5bkYG4Q
— Major League Cricket (@MLCricket) July 16, 2023
सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर सिएटल ओर्काससाठी कॅमरून गॅननने 3.5 षटकात 23 धावा करून 4 विकेट्स घेतल्या. त्याव्यतिरिक्त अँड्र्यू टाय आणि ईमाद वसीम यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. गोलंदाजांच्या चांगल्या कामगिरीमुळे सिएटल संघाला 35 धावांनी विजय मिळवला. (The batsman was making runs like walking in the garden, the fielder took the opportunity and showed the way to the tent)
महत्वाच्या बातम्या –
‘अनारकली’चा उल्लेख करून रोहितने स्वत:च्या पायावर मारली कुऱ्हाड, पत्नी रितिकाने खोलली पोल; कमेंट व्हायरल
खूपच कमी वयात आफ्रिदीची कसोटीत मोठी कामगिरी, श्रीलंकेच्या सलामीवीराची विकेट घेताच रचला विक्रम; पाहा व्हिडिओ