भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने ७ विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी अप्रतिम खेळ दाखवला. मात्र, दुसऱ्या सामन्यात संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला संधी दिली गेली नाही. सिराजच्या जागी आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या हर्षल पटेलला प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले गेले. हर्षलही त्याच्यावर दाखवण्यात आलेल्या या विश्वासाला पात्र ठरला आहे. हर्षलसाठी हा त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना ठरला.
मोहम्मद सिराज या टी२० मालिकेच्या पहिल्या सामन्यात खेळला होता. त्याने पहिल्या सामन्यात चार षटकांमध्ये ३९ धावा दिल्या आणि एक विकेट घेतली होती. भारतीय संघाने पहिल्या टी२० सामन्यात ५ विकेट्सने विजय मिळवला होता. पण. त्याला या सामन्यादरम्यान हाताच्या बोटाला दुखापत झाली होती. आता याच पार्श्वभूमीवीर त्याला दुसऱ्या सामन्यात संधी दिली गेली नाही. बीसीसीआयने याबाबत माहिती दिली.
बीसीसीआयने मोहम्मद सिराजाल प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर करण्याविषयी सांगितले आहे की, “जयपूरमध्ये पहिल्या टी२० सामन्यात स्वतःच्या गोलंदाजीवर क्षेत्ररक्षण करताना सिराजच्या डाव्या हाताच्या बोटांमध्ये दुखापत झाली. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याच्या प्रगतीवर नजर ठेवून आहे.”
???? UPDATE: MD Siraj got a web split on his left hand while fielding on his own bowling in the 1st T20I in Jaipur.
The BCCI medical team is closely monitoring his progress.#TeamIndia @Paytm #INDvNZ pic.twitter.com/9h4RnRGfkb
— BCCI (@BCCI) November 19, 2021
दरम्यान, सिराजच्या जागी दुसऱ्या टी२० सामन्यात संधी मिळालेल्या हर्षल पटेलने त्याच्या पदार्पण सामन्यात सामनावीर पुरस्कार मिळवला. त्याने या सामन्यात चार षटकांच्या स्पेलमध्ये २५ धावा दिल्या आणि २ महत्वाच्या विकट्स घेतल्या. त्याव्यतिरिक्त संघातील दीपक चाहत, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन आणि भुवनेश्वर कुमार या गोलंदाजांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ विकेट्सच्या नुकसानावर १५३ धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने १७.२ षटकात आणि ३ विकेट्सच्या नुकसानावर विजय मिळवला. भारताचे सलामीवीर केएल राहुल (६५) आणि रोहित शर्मा (५५) यांनी विजयात महत्वाचे योगदान दिले.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताकडून दुसऱ्या टी२०त न्यूझीलंड चारीमुंड्या चीत, ‘हे’ ५ खेळाडू ठरले विजयाचे शिल्पकार






