---Advertisement---

हर्षा भोगलेंनी शेअर केला खास जूना फोटो; पहा ओळखू येतात का तूम्हाला त्यातील क्रिकेटर्स

---Advertisement---

नवी दिल्ली: क्रिकेटर्सची जुनी छायाचित्रे बर्‍याचदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. असे एक छायाचित्र रविवारी ट्विटरवर प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनी शेअर केले आहे. यावेळी त्यांनी तुमच्यातील किती जण या क्रिकेटपटूंना ओळखू शकतील हे विचारले.

या छायाचित्रात सर्व क्रिकेटर्स वेगवेगळ्या पोशाखात दिसत आहेत. १९८३ मध्ये आपल्या कर्णधारपदी पहिल्यांदाच भारताला विश्वविजेता बनवणारे कपिल देव पंजाबी वेशभूषेत दिसत आहेत, तर डब्ल्यू.व्ही. रमण लुंगी आणि कुर्तामध्ये उभे असल्याचे दिसत आहे.

किरण मोरे, माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन, भाजपचे माजी खासदार आणि क्रिकेटपटू नवजोतसिंग सिद्धू हेही या छायाचित्रात दिसत आहेत.

या फोटोवर प्रतिक्रिया देताना माजी क्रिकेटर डब्ल्यू.व्ही. रमण यांनी लिहिले की, दिग्गज सचिन तेंडुलकर आणि माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी या फोटोमध्ये नाहीत, मग एका वापरकर्त्याने सचिन आणि कांबळी यांचे फोटोही शेअर केले. त्या चित्रात सचिन छत्री धरून उभा आहे आणि हे दोघेही मराठी वेशभूषेत दिसत आहेत.

https://twitter.com/PABadami/status/1300128011828641793

या अशा आगळ्यावेगळ्या फोटो मागील कारणही रमण यांनी स्पष्ट केले. एका ट्विटर युजरने अशा वेगवेगळ्या वेशभूषेत फोटो काढण्यामागचे कारण विचारले होते.

यावर उत्तर देताना रमण यांनी सांगितले की ‘प्रसारण कर्त्यांना 1993 च्या स्वातंत्र्यदिनासाठी एव्ही (AV) करायचा होता. आम्ही जून/जूलैच्या आसपास श्रीलंकेला रवाना होणार होतो.’

महत्त्वाच्या बातम्या –

चेस ऑलिंपियाड: भारतीय बुद्धिबळपटूंनी रचला इतिहास; पहिल्यांदा पटकावले सुवर्णपदक

एस श्रीसंत लागला क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीला; शेअर केले व्हिडिओ

ही भारतीय कंपनी झाली आयपीएलची पार्टनर; बीसीसीआयने केली घोषणा

ट्रेंडिंग लेख –

सुरैश रैनाऐवजी यंदा हे ३ खेळाडू बनू शकतात चेन्नई सुपर किंग्सचे उपकर्णधार

आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई अडकलीय दुविधेत; पहा काय आहेत त्यामागील ३ कारणे

तेराव्या हंगामानंतर ‘या’ २ भारतीय खेळाडूंना मिळू शकते आयपीएलमधून नेहमीसाठी सुट्टी, वाचा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---