भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसखर ट्रॉफी सध्या चांगलीच रंगात आहे. मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला गेला. भारताने हा सामना एक डाव आणि 132 धावांनी जिंकला. उभय संघांतील दुसरा सामना 17 फेब्रुवारीपासून दिल्लीमध्ये खेळला जाणार आहे. मालिकेतील तिसऱ्या सामन्याविषयी मात्र मोठी माहिती समोर आली आहे. तिसरा कसोटी सामना धरमशाला याठिकाणी आयोजित केला जाणार होता. पण आता हा सामना रद्द करून दुसरीकडे खेळवला जाणार आहे.
बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील (BGT 2023) पहिल्या सामन्यात खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल असल्याचे पाहायला मिळाले. परिणामी ऑस्ट्रेलियन संघाला याठिकाणी अपेक्षित प्रदर्शन करता आले नाही आणि दोन्ही डावांमध्ये त्यांचा संघ स्वस्तात बाद झाला. धरमशाला (Dharmalshala Test) स्टेडियमची खेळपट्टीही गोलंदाजांसाठी अनुकूल असल्याचे पाहायाला मिळाले आहे आणि याठिकाणीही फलंदाज धावा करण्यासाठी झगडताना दिसू शकतात. मात्र, बीसीसीआयने याठिकाणी 1 मार्चपासून सुरू होणारा सामना रद्द केला आहे. आता मालिकेतील हा तिसरा सामना इंदोर स्थित होळकर स्टेडियमवर आयोजित केला जाणार आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार बीसीसीआयचे क्यूरेटर तपोश चटर्जी यांनी धरमशाला स्टेडियमच्या खेळपट्टीची पाहणी केली. बीसीसीआयनेच त्यांना स्टेडियमचे एकंदरीत पाहणी करण्यासाठी याठिकाणी पाठवले होते. चटर्जी यांनी त्यांचा अंतिम अहवाल बीसीसीआयकडे सोपवला. स्टेडियमची अहवाल आणि एकंदरीत परिस्थिती पाहिल्यानंतर बीसीसीआय अधिकाऱ्यांनी याठिकाणचा सामना रद्द केल्याचे पाहायला मिळते. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्राकडून अशी माहिती मिळाली की, “सामन्या खेळवला जाण्यासाठी बीसीसीआयचे स्टेडियमसाठी काही नियम आहेत. या मैदानावर कोणताच प्रतिस्पर्धी सामना खेळवला गेला नाहीये आणि आउटफिल्ड देखील तयार नाहीये”
NEWS – Venue for third Test of the @mastercardindia Australia tour of India for Border-Gavaskar Trophy shifted to Indore from Dharamsala. #INDvAUS
More details here – https://t.co/qyx2H6N4vT pic.twitter.com/N3W00ukvYJ
— BCCI (@BCCI) February 13, 2023
दरम्यान, भारतीय संघाला आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धचे पुढचे किमान दोन सामने जिंकावे लागतील. मालिका नावावर केल्यानंतर भारताची अंतिम सामन्यातील जागा जवळपास पक्की मानली जाऊ शकते. सध्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये भारत 1-0 अशा आघाडीवर आहे. (The third Test match of the BGT2023 will be played in Indore instead of Dharamsala)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नागपूरमध्ये चाहत्यांनी अश्विनचे केले नवे नामकरण, स्वतः सोशल मीडियावरून दिली माहिती
रोहितसह ‘या’ तीन भारतीयांनी कसोटी पदार्पणातच काढलेला विरोधी गोलंदाजांचा घाम, एक दिग्गजही यादीमध्ये