सध्या भारतात वनडे विश्वचषक खेळला जात आहे. विश्वचषकात ग्रुप स्टेजमधील स्पर्धा दिवसेंदिवस वाढत चालली आहे. संघ पहिल्या चार मध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, जेणेकरून त्यांना उपांत्य फेरीत संधी मिळेल. मात्र, माध्यमांतील वृत्तांनुसार संग पहिल्या चार स्थानांसह पहिल्या सात क्रमांकांमध्ये स्थान मिळवण्यासाठी झगडत आहेत. कारण ठरत आहे 2025 मध्ये खेळला जाणारी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Tropty 2025) स्पर्धा पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार या महत्वाच्या स्पर्धेसाठी चालू वर्षीच्या विश्वचषकात पहिल्या सात संघांना पात्र धरले जाणार आहे. म्हणजेच विश्वचषकात पहिल्या सात संघांमध्ये सामील असणारे संघ दोन वर्षांनी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळू शकणार आहेत. तसेच यजमान पाकिस्तान संघाला या स्पर्धेत थेड प्रवेश मिळणार आहे.
एका माध्यमाशी बोलताना आयसीसीच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले की, 2021 मध्येच याबाबत माहीत दिली गेली होती. आयसीसीने 2021 मध्ये पुढच्या आठ वर्षांत आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांची माहिती जाहीर केली होती. यात वनडे विश्वचषक, टी-20 विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धांचा समावेश होता. मोठ्या काळानंतर बंद पडलेली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पुन्हा एकदा सुरू होणार, हे यावेळी समोर आलेल्या वेळापत्रकातून स्पष्ट झाले होते. सोबतच या आयसीसी स्पर्धा कोणत्या देशांमध्ये खेळवल्या जाणार हेदेखील यात सांगितले गेले होते. वनडे विश्वचषक 2023 मध्यात आला असताना आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या चर्चा होण्यामागे बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसन आहे, असे आपण म्हणू शकतो. शाकीबने नुकतेच एका पत्रकार परिषदेत वनडे विश्वचषकादरम्यान त्यांचा संघ पहिल्या सातमध्ये राहण्याचा प्रयत्न करेल, असे म्हटले म्हणाला होता. बांगलादेशने विश्वचषकात पहिल्या सहा पैकी फक्त एक सामना जिंकला असून त्यांचा संघ स्पर्धेतून बाहेर पडल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी विश्वचषकातील पहिल्या सात संघांना संधी मिळाली, तर काही संघ आहेत, ज्यांच्या अडचणी वाढू शकतात. यात प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो वेस्ट इंडीज संघाचा. त्याचसोबत झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांनाही चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकावे लागेल. क्रिकेटविश्वात या तिन्ही संघांना महत्व आहे. मात्र, वनडे विश्वचषकासाठी अपात्र ठरल्यामुळे आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीमधूनही त्यांचा पत्त कट होण्याची शक्यता आहे. असेही सांगितले गेले आहे की, चॅम्पियन्स ट्रॉफीत एकूण आठ संघ खेळू शकतात. प्रत्येकी चार-चार संघांचे गट केले जाणार असून ग्रुप स्टेजनंतर थेट उपांत्य सामने खेळवले जातील. (The top 7 teams from the World Cup will be given a chance for the 2025 Champions Trophy)
महत्वाच्या बातम्या –
रोहितने गाजवलं 2023 वर्ष, ‘असा’ कारनामा करणारा ठरला तिसरा फलंदाज
दोशी इंजिनिअर्स करंडक आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदु जिमखाना संघाचा सलग तिसरा विजय