इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने फिरकी खेळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे फिरकीपटूंना तासनतास सतत खेळत राहणे. असे म्हटले आहे. फिरकी खेळण्याचा कोणताही जलद मार्ग नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत फिरकीपटूंविरुद्ध झगडताना दिसलेल्या भारतीय फलंदाजांवर त्याने निशाणा साधला आहे. भारताचा किवीजकडून 3-0 असा पराभव झाला आणि प्रथमच भारताला घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत 3 किंवा त्याहून अधिक सामन्यांत क्लीन स्वीपचा सामना करावा लागला.
केविन पीटरसनने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट करत लिहले की, जेव्हा स्पिन खेळण्याची वेळ येते तेव्हा तासनतास त्याच्याविरुद्ध खेळणे हा एकमेव मार्ग आहे! अशाप्रकारे पीटरसनने फलंदाजांवर प्रश्न उपस्थित केले आहेत, ज्यांना फिरकीपटूंना खेळणे कठीण जाते.
No one should be surprised by the lack of batting application and technique in Test Match cricket. Cricket is a ‘smackers’ game now and there is a disintegration of Test Match batting skill in the game.
When it comes to playing spin, the only way, spend time playing against it…— Kevin Pietersen🦏 (@KP24) November 4, 2024
टीम इंडियाला घरच्या मैदानावर आधिक मजबूत मानले जाते. कारण टीम इंडियाने 12 वर्षांपासून घरच्या मैदानावर एकही कसोटी मालिका गमावली नव्हती. एवढेच नाही तर, या मालिकेत जितके सामने गमावले तितकेही सामने गमावले नाहीत. पहिल्या सामन्यात वेगवान गोलंदाजांनी चमकदार गोलंदाजी केली असली तरी उर्वरित सामन्यांमध्ये आणि डावात फिरकीपटूंनी वर्चस्व गाजवले. साधारणपणे भारतीय फलंदाज फिरकी खेळण्यात सक्षम मानले जातात. पण किवी संघाचे फिरकीपटू एजाज पटेल, मिचेल सँटनर आणि ग्लेन फिलिप्स यांनी भारताला खडतर ठरले. तसेच आर.अश्विन, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव सारखे भक्कम फिरकी गोलंदाज दीर्घकाळ आपल्याच परीस्थितीत झुंजताना दिसले.
हेही वाचा-
Happy Birthday Virat Kohli: ‘चेस मास्टर’ विराट कोहलीचे हे 5 विक्रम मोडणे अशक्य! जवळपासही कोणी नाही
रोहित शर्मानंतर कसोटीत कर्णधार कोण? दिग्गज क्रिकेटपटूचा धक्कादायक अंदाज!
रिषभ पंत आणि आर अश्विनला विकत घेण्यासाठी सीएसके कोट्यवधी खर्च करायला तयार!