इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल २०२१ चे आयोजन एप्रिल महिन्यात करण्यात येणार आहे. तसेच आयपीएल स्पर्धेचे आयोजन भारतात होणार की भारताबाहेर यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. येत्या १८ फेब्रुवारी रोजी चेन्नई मध्ये आयपीएल स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव करण्यात येणार आहे. सर्व संघांनी आपले मुख्य खेळाडू रिटेन केले आहेत तर इतर खेळाडूंना रिलीज केले आहे. अशातच या आयपीएल मध्ये खेळाडूंचे एका संघातून दुसऱ्या संघात फेरबदल पाहायला मिळू शकतील. तसेच प्रत्येकाला उत्सुकता लागून आहे की, आपला आवडता खेळाडू कोणत्या संघात खेळणार.
मात्र असेही काही खेळाडू आहेत, ज्यांची कोणत्याही संघात निवड होणे कठीण आहे. या लेखात आपण त्याच खेळाडूंबद्दल जाणून घेऊया.
१) जेम्स नीशम
आयपीएल २०२० च्या सत्रात किंग्स इलेव्हेन पंजाब संघातून खेळलेला जेम्स नीशम याच्याकडून संघाला चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा होती. परंतु त्याने असे काहीच केले नाही. पंजाब संघासाठी नीशम याने ५ सामने खेळले. यात त्याने अवघ्या १९ धावा केल्या. तसेच गोलंदाजी मध्ये त्याला फक्त २ गडी बाद करण्यात यश आले. या प्रदर्शनाच्या जोरावर नीशम याला कुठला संघ आपल्या संघात समाविष्ट करेल असे वाटत नाही.
२) स्टीव्ह स्मिथ
ऑस्ट्रेलियन संघाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये अनेक विक्रम केले आहेत. परंतु आयपीएल स्पर्धेत साजेशी कामगिरी करण्यास त्याला अपयश आले आहे. २०२० च्या आयपीएल सत्रात स्टीव्ह स्मिथ याला राजस्थान रॉयल्स संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. परंतु काही सामन्यानंतर पुन्हा काढून घेण्यात आले. २०२१ च्या आयपीएल सत्रासाठी राजस्थान रॉयल्स संघातून स्टीव्ह स्मिथ याला रिलीज केले आहे. तसेच आयपीएल २०२१ च्या लिलावात स्मिथची मूळ किंमत २ करोड इतकी असणार आहे.
३) केदार जाधव
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव याने भारतीय संघाच्या अनेक विजयांमध्ये महत्वाचे योगदान दिले आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून त्याला साजेशी कामगिरी करण्यास अपयश आले आहे. आयपीएल २०२० मध्ये देखील त्याला चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळताना फॉर्म गवसला नाही. यामुळेच आयपीएल २०२१ साठी चेन्नई सुपर किंग्स संघाने केदार जाधवला रिलीज केले आहे. तसेच आयपीएल २०२१ साठी होणाऱ्या लिलावात केदार जाधव याची मूळ किंमत २ करोड इतकी असणार आहे. पण मागील आयपीएल स्पर्धेतील कामगिरी पाहता या सत्रात त्याला कोणताही संघ समाविष्ट करून घेईल असे वाटत नाहीये.
महत्वाच्या बातम्या:
चेन्नई कसोटीत रहाणेचा ‘बदक’, सेहवाग-मुरलीला पछाडत लाजिरवाण्या विक्रमात मिळवलं अव्वलस्थानी
दक्षिण आफ्रिकेत जन्माला येतोय नवा एबी डिविलियर्स, पाहा कशी करतोय गोलंदाजांची ३६० डिग्री धुलाई
दुसर्या कसोटीतून रोहित, रहाणेसह ‘हा’ खेळाडू होणार ‘आउट’? कर्णधार कोहली कठोर निर्णय घेण्याची शक्यता