आज(२३ सप्टेंबर) दुबईच्या मैदानावर आयपीएल २०२०चा पाचवा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रंगणार आहे. मुंबईचा हा हंगामातील दुसरा सामना आहे तर कोलकाताचा हा पहिलाच सामना असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ७.३० वाजता या सामन्याची सुरुवात होईल.
या सामन्यात मुंबई आणि कोलकाता या दोन्ही संघातील खेळाडूंना अनेक दमदार विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे. आम्ही तुम्हाला या लेखात, त्याच विक्रमांविषयी माहिती देणार आहोत. चला तर जाणून घेऊया…
कोलकाता संघातील खेळाडूंच्या निशाण्यावर असलेले विक्रम
१) गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू सुनिल नरेनने जर या सामन्यात ६ षटकार मारले. तर तो त्याचे आयपीएल कारकिर्दीतील ५० षटकार पूर्ण करेल. हा एका गोलंदाजी अष्टपैलूच्या नावावर होणारा मोठा दमदार विक्रम ठरेल.
२) कोलकाता संघाचा दिग्गज अष्टपैलू फलंदाज आंद्रे रसेल या सामन्यात त्याचे आयपीएलमधील १०० चौकार पूर्ण करु शकतो. त्याने आजवर आयपीएलमध्ये एकूण ९६ चौकार ठोकले आहेत. त्यामुळे त्याला १०० चौकार पूर्ण करण्यासाठी फक्त ४ चौकारांची गरज आहे.
३) कोलकाताचा २१ वर्षीय युवा फलंदाज शुभमन गिल हा आजच्या सामन्यात त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील ५०० धावा पूर्ण करु शकतो. यासाठी त्याला फक्त १ धाव करण्याची गरज आहे.
मुंबई संघातील खेळाडूंच्या निशाण्यावर असलेले विक्रम
१) मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माला या सामन्यात ५००० धावा पूर्ण करण्याची संधी आहे. त्याने आतापर्यंत आयपीएल कारकिर्दीत ४९१० धावा केल्या आहेत. जर आजच्या सामन्यात त्याने ९० धावा केल्या. तर तो ५००० धावांचा आकडा गाठेल आणि यासह आयपीएलमध्ये ५००० धावा करणारा तिसरा फलंदाज ठरेल.
२) या सामन्यात सौरभ तिवारीला आयपीएलमधील ५० षटकार पूर्ण करण्याची संधी आहे. त्याने आतापर्यंत एकूण ४६ षटकार मारले आहेत.
३) जर आजचा सामना मुंबईने जिंकला. तर मुंबईचा कर्णधार रोहित हा एका संघाविरुद्ध सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम करु शकतो.
संघाद्वारे या सामन्यात बनणारे विक्रम
१) कोलकाता आणि मुंबई संघांनी आतापर्यंत एकमेकांविरुद्ध एकूण १३ सामने खेळले आहेत. त्यापैकी कोलकाताने ६ सामन्यात तर मुंबईने १९ सामन्यात विजय मिळवला आहे. यासह मुंबईकडे आजचा सामना जिंकत कोलकाताविरुद्ध २० सामने जिंकण्याची संधी आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
दुर्दैव! फाफ डु प्लेसिस सारखी वेळ कोणावरही येऊ नये
पुन्हा एकदा राजस्थानविरुद्धच्या सामन्यात धोनीने घातला पंचाशी वाद, ‘हे’ आहे कारण
तू वरच्या क्रमांकावर फलंदाजीला का येत नाही? धोनीने दिले ‘हे’ उत्तर
ट्रेंडिंग लेख –
दे घुमा के! भारतीय फलंदाज गाजवतायेत आयपीएलचा १३ वा हंगाम
वाढदिवस विशेष- माहित नसलेला अंबाती रायडू
‘या’ ३ फलंदाजांचे ट्वेंटी२०मध्ये आहे मोठे नाव, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर करता आले नाही एकही अर्धशतक