fbpx
Sunday, April 18, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दुर्दैव! फाफ डु प्लेसिस सारखी वेळ कोणावरही येऊ नये

September 23, 2020
in क्रिकेट, IPL, टॉप बातम्या
0

आयपीएलच्या १३ व्या हंगामात काल(२२ सप्टेंबर) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात सामना पार पडला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने १६ धावांनी विजय मिळवला. हा त्यांचा या हंगामातील पहिला विजय होता.

या सामन्यात राजस्थानने चेन्नईला विजयासाठी २१७ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला निर्धारित २० षटकात ६ बाद २०० धावाच करता आल्या. चेन्नईकडून फाफ डु प्लेसिसने सर्वाधिक ७२ धावांची खेळी केली.  ही खेळी त्याने ३७ चेंडूत १ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने केली. पण त्याची ही खेळी चेन्नईला विजय मिळवून देऊ शकली नाही.

फाफ डु प्लेसिसची आयपीएल कारकिर्दीतील ही तिसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च वैयक्तिक खेळी होती. विशेष म्हणजे त्याने आयपीएलमध्ये केलेल्या पहिल्या ३ सर्वोच्च वैयक्तिक खेळींपैकी २ वेळा तो पराभूत संघाकडून खेळला होता. म्हणजेच कारकिर्दीतील सर्वोच्च खेळी करुनही त्याच्या संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. २०१९ मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध त्याने ९६ धावांची खेळी केली होती. ही त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम खेळी आहे. परंतु त्या सामन्यातही चेन्नई सुपर किंग्सचा संघ पराभूत झाला होता. तसेच त्याने जेव्हा २०१२ ला राजस्थान विरुद्धच ७३ धावांची खेळी केली होती, तेव्हा चेन्नई संघाला शेवटच्या चेंडूवर विजय मिळाला होता.

एवढेच नाही तर आंतरराष्ट्रीय टी२०मध्येही डु प्लेसिसने त्याच्या कारकिर्दीत केलेल्या पहिल्या ३ सर्वोच्च वैयक्तिक खेळींमध्ये तो पराभूत संघाचा भाग होता. डु प्लेसिसने २०१५ ला वेस्ट इंडिजविरुद्ध ११९ धावांची सर्वोच्च टी२० खेळी केली होती. परंतु त्यावेळीही दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा सामना करावा लागला. तसेच २०१३ मध्ये जेव्हा त्याने श्रीलंकेविरुद्ध ८५ धावांची खेळी केली तेव्हाही दक्षिण आफ्रिदा पराभूत झाली होती. तर २०१६ मध्ये डु प्लेसिसने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७९ धावांची खेळी केली. तेव्हाही त्याला पराभवाचेच तोंड पहावे लागले. या तिन्ही खेळी डु प्लेसिसच्या आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी आहेत.

#फाफ डु प्लेसिसच्या आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीतील सर्वोत्तम ३ खेळी – 

११९ धावा विरुद्ध वेस्ट इंडिज, २०१५ (दक्षिण आफ्रिका पराभूत)

८५ धावा विरुद्ध श्रीलंका, २०१३ (दक्षिण आफ्रिका पराभूत)

११९ धावा विरुद्ध ऑस्ट्रेलिया, २०१६ (दक्षिण आफ्रिका पराभूत)

#फाफ डु प्लेसिसच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वोत्तम ३ खेळी – 

९६ धावा विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब, २०१९ (चेन्नई पराभूत)

७३ धावा विरुद्ध राजस्थान रॉयल्स, २०१२ (चेन्नईचा शेवटच्या चेंडूवर विजय)

७२ धावा विरुद्ध राजस्थान रॉयल्स, २०२० (चेन्नई पराभूत)


Previous Post

आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं! एकाच सामन्यात पडला ‘एवढ्या’ षटकारांचा पाऊस

Next Post

आयपीएलमधील ५ स्टार फलंदाज, जे सर्वाधिक वेळा झालेत शुन्यावर बाद

Related Posts

Photo Courtesy: Twitter/IPL/ICC
IPL

वडिलांच्या चुकीमुळे ‘रोहन’चा झाला ‘केएल राहुल’; वाचा भारताच्या या यष्टीरक्षकाच्या आयुष्यातील माहित नसलेले किस्से

April 18, 2021
Photo Courtesy: Twitter/@SunRisers
IPL

MIvSRH: फॉर्मात असलेल्या नटराजनला संघाबाहेर ठेवण्यामागचे कारण काय? संघ डायरेक्टरनी दिले उत्तर

April 18, 2021
Photo Courtesy: Screengrab/Hotstar
IPL

क्षेत्ररक्षण करताना ट्रेंट बोल्टचा तोल गेला अन् घडलं असं काही; चाहते म्हणाले, ‘ही फील्डिंग की स्विमिंग’

April 18, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

‘आमच्यासोबत हे काय घडतंय काहीच कळेना,’ सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार वॉर्नरने व्यक्त केली नाराजी 

April 18, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चाहर-बोल्टच्या भेदक माऱ्यापुढे ‘ऑरेंज आर्मी’ गारद; आयपीएलच्या मोठ्या विक्रमात मुंबईकर अव्वलस्थानी

April 18, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

सुपर संडे: आज कोहली-मॉर्गन आमने सामने, ‘अशी’ असेल आरसीबी आणि केकेआरची प्लेइंग XI

April 18, 2021
Next Post

आयपीएलमधील ५ स्टार फलंदाज, जे सर्वाधिक वेळा झालेत शुन्यावर बाद

झिम्बाब्वेला क्रिकेटमध्ये मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या ऍलिस्टर कॅम्पबेलची कारकिर्द एक अध्याय ठरली

'या' ३ फलंदाजांचे ट्वेंटी२०मध्ये आहे मोठे नाव, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर करता आले नाही एकही अर्धशतक

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.