शुक्रवारी (23 जून) वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी आणि वनडे संघांची घोषणा केली गेली. कसोटी संघाचा कर्णधार म्हणून रोहित शर्मा याच्याकडे जबाबदारी कायम ठेवली असून, पुनरागमन केलेल्या अनुभवी अजिंक्य रहाणेकडे पुन्हा एकदा संघाचे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. याव्यतिरिक्त दोन्ही संघात अनेक युवा खेळाडूंना देखील संधी मिळालीये. या संघावरून इतके तरी दिसून येते की, भविष्यात भारतीय संघ कशाप्रकारे असू शकतो.
यशस्वी जयस्वाल- देशांतर्गत क्रिकेट तसेच आयपीएलमध्ये धावांचा अक्षरशः रतीब घातल्यानंतर यशस्वी जयस्वाल याला भारतीय संघात संधी मिळाली आहे. मागील वर्षी देशांतर्गत हंगामात त्याने सर्वाधिक धावा बनवल्या होत्या. तसेच आयपीएलमध्ये तो उदयोन्मुख क्रिकेटपटू ठरलेला. हा सर्व विचार करत त्याला आता कसोटी संघात संधी मिळाली आहे. चेतेश्वर पुजाराच्या जागी तो तिसऱ्या स्थानी आपला हक्क सांगू शकतो.
ऋतुराज गायकवाड- सलग तिसऱ्या वर्षी आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर ऋतुराजची भारतीय संघातील जागा पक्की होताना दिसतेय. आतापर्यंत भारतासाठी एक वनडे व 9 टी20 खेळलेला ऋतुराज प्रथमच कसोटी संघात दिसेल. विशेष म्हणजे या दौऱ्यावर दोन्ही संघात खेळताना दिसणार आहे.
संजू सॅमसन- आयपीएल व देशांतर्गत क्रिकेटचा अपार अनुभव असलेल्या संजू सॅमसन याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अद्याप तितकी संधी मिळाली नाही. परंतु, भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकाच्या दृष्टीने बीसीसीआय व निवडसमिती त्याला वनडे संघाचा नियमित भाग बनवण्याची शक्यता वर्तवली जातेय.
मुकेश कुमार- बंगालचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार याला देखील देशांतर्गत क्रिकेट व आयपीएलमधील चांगल्या कामगिरीचे बक्षीस मिळाले. मोहम्मद शमी याला विश्रांती दिल्याने मुकेश आता भारतीय संघासाठी पदार्पण देखील करू शकतो.
उमरान मलिक- भारतातील सर्वात वेगवान गोलंदाज मानल्या जाणाऱ्या उमरान मलिक याला देखील पुन्हा संधी दिली गेली. यावर्षी आयपीएल हंगामात तो अपेक्षित कामगिरी करू शकला नव्हता. तरीही निवड समितीने त्याच्यावर विश्वास दाखवत, भविष्यासाठी त्याला तयार करण्याकरिता या दौऱ्यावर निवडले आहे.
(These Five Cricketer Selected In Team India For West Indies Tour BCCI Looking For Future Team)
महत्वाच्या बातम्या –
भारतीय वेगवान माऱ्यात आणखी एक भरती! वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी आयपीएल गाजवलेल्या गोलंदाजाला संधी
सर्फराजशी पुन्हा धोका! देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पहाड रचूनही टीम इंडियाचे दार बंदच