येत्या ६ फेब्रुवारी पासून भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) हे दोन्ही संघ ३ वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी आमने सामने येणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेली वनडे मालिका ३-० ने गमावल्यानंतर भारतीय संघ या मालिकेत जोरदार पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. बीसीसीआयने बुधवारी ( २६ जानेवारी ) वनडे आणि टी२० मालिकेसाठी १८ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.
या संघात अनेक बदल करण्यात आले आहेत. संघातील मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit bumrah) आणि मोहम्मद शमी (Mohammad Shami) यांना संघात स्थान देण्यात आले नाहीये. तर युवा वेगवान गोलंदाज आपल्या गोलंदाजीचा जलवा दाखवताना दिसून येणार आहेत.
या कारणामुळे मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहला नाही दिली संधी
भारतीय संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी हे गेल्या कित्येक दिवसांपासून सतत क्रिकेट खेळत आहेत. त्यांच्यावरील ताण कमी करण्यासाठी त्यांना आगामी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. हे दोघेही वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या वनडे आणि टी२० मालिकेत खेळताना दिसून येणार नाहीये.
या वेगवान गोलंदाजांवर असेल जबाबदारी
संघातील दिग्गज गोलंदाज संगबाहेर असताना मोहम्मद सिराज आणि भुवनेश्वर कुमार या अनुभवी गोलंदाजांवर भारतीय वेगवान गोलंदाजी आक्रमणाची जबाबदारी असणार आहे. तसेच फलंदाजी आणि वेगवान गोलंदाजीने दक्षिण आफ्रिकेत आपला जलवा दाखवणाऱ्या शार्दुल ठाकूरला देखील या मालिकेत चांगली कामगिरी करावी लागणार आहे.
तसेच आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व केलेला गोलंदाज आवेश खानला देखील या संघात संधी देण्यात आली आहे. प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षल पटेल या दोन्ही गोलंदाजांनी देखील आयपीएल स्पर्धेत आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. त्यामुळे या गोलंदाजांना संघात संधी मिळाली, तरी हे गोलंदाज वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना अडचणीत टाकू शकतात.
महत्वाच्या बातम्या :
देने वाला जब भी देता है…! आधी आयपीएलच्या नव्या संघात संधी अन् आता भारतीय संघातही निवड
भारतीय संघातील ३ न्यू कमर्स, ज्यांना मिळू शकते वनडे पदार्पण करण्याची संधी
हे नक्की पाहा: