काही खेळाडू बऱ्याच क्रिकेट प्रेमींसाठी आदर्श असतात, तर काही त्यांना देवाप्रमाणे मानतात. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) बाबत सुद्धा असंच काहीसं आहे. त्याच्या विक्रमामुळे, मैदानावरचा संयमी अंदाज आणि कर्णधार असताना प्राप्त केलेलं यश यामुळे चाहते त्याच्यासाठी वेडे आहेत. धोनी जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे, तरी तो कमाईत भल्या भल्यांना मागे टाकत आहे. या तर मग जाणून घेऊया धोनी एका वर्षात किती कमाई करतो.
महेंद्रसिंग धोनीने जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे तरी त्याची लोकप्रियता आणि चाहते कमी नाही आहेत. धोनीला बरेच तरुण खेळाडू आदर्श मानतात. धोनीने कर्णधार असताना भारताला तिन्ही आयसीसी ट्रॉफी जिंकवून दिल्या. टी२० विश्वचषक (२००७), वनडे विश्वचषक (२०११) आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (२०१३) या जिंकवून दिल्या. धोनीचं वय आता ४० आहे, तरी देखील तो फिट आहे आणि इतर क्रिकेटरपेक्षा त्याची कमाईसुद्धा जास्ती आहे.
धोनी छोट्या शहरातून आला पण त्याचं स्वप्न मोठं होत. भारतीय संघात जागा मिळवली त्यानंतर तो कर्णधार झाला आणि स्वतःच्या नेतृत्वात भारताला वनडे आणि टी-२० विश्वचषक जिंकून दिले. आज त्याच्याकडे भरपूर गाड्या आहेत. आलिशान असं फार्म हाऊस आहे आणि बाकी काही संपत्तीचा मालक सुद्धा आहे.
सीए नॉलेजच्या एका अहवालानुसार धोनीची एकूण मालमत्ता जवळपास ८४६ करोड आहे. यावरून समजते की त्याची मालमत्ता बाकी काही खेळाडूंपेक्षा जास्ती आहे. एका अहवालानुसार, धोनी वर्षात जवळपास ५० करोड कमवतो. ज्यात फक्त आयपीएलमधूनच (IPL) त्याला १२ करोड मिळतात. यासोबत तो मोठ्या ब्रँडसोबत जोडला गेला आहे. तो त्याची स्वतःची ‘सेवन’ (Seven) कंपनी सुद्धा चालवतो.
चाहत्यांमध्ये ‘माही’ (Mahi) नावाने प्रासिद्ध असणाऱ्या धोनीच्या आयुष्यावर चित्रपट देखील आला होता. धोनीने २०१० मध्ये साक्षीशी विवाह केला. साक्षी सिंग (Sakshi Singh) मूळची उत्तराखंडची आहे. साक्षी इंस्टाग्रामवर (Sakshi Singh Instagram) नेहमी सक्रिय असते. साक्षी एका कंपनीमध्ये डायरेक्टर पदावर होती, जिथे तिचा २५ टक्क्यापेक्षा जास्ती हिस्सा होता. काही अहवालांनुसार साक्षी आता एक एंटरटेनमेंट कंपनी उघडणार आहे.
एमएस धोनीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, त्याचे वडिलोपार्जित गाव अल्मोडा, उत्तराखंडमधील लमग्रामध्ये आहे. त्यांचे वडील पान सिंग हे उत्तराखंडमधून रांचीला स्थायिक झाले आणि त्यांनी मेकॉनमध्ये कनिष्ठ व्यवस्थापन पदावर काम केले होते. धोनीला एक बहीण (जयंती गुप्ता) आणि एक भाऊ (नरेंद्र सिंग धोनी) आहे.
धोनीने त्याच्या कारकिर्दीत ९० कसोटी सामने, ३५० एकदिवसीय सामने, ९८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटी सामन्यात त्याने ६ शतक आणि ३३ अर्धशतकांसह ४८७६ धावा केल्या. तसेच एकदिवसीय सामन्यात १० शतक आणि ७३ अर्धशतकांसह १०७७३ धावा केल्या. टी-२० आंतरराष्ट्रीय मध्ये त्याने एकूण १६१७ धावा केल्या. धोनीने एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीजच्या ट्रेव्हिस डॉलिनची (Trevis Dowlin) विकेट घेतली जी त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली एकमेव विकेट आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल २०२२ बाबत बीसीसीआय अध्यक्षांनी दिली महत्त्वाची अपडेट; वाचा सविस्तर
“लोकं काय बोलतात यावर माझं लक्ष नाही”, वनडे कर्णधारपद स्वीकारल्यानंतर रोहितची पहिली प्रतिक्रीया
‘रोहित…तुझी फलंदाजी व कॅप्टन्सी विराटपेक्षा भारी,’ पाहा कुणी केलाय रोहितवर कौतूकाचा वर्षाव