भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. विशाखापट्टणम येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ४८ धावांनी विजय मिळवला. या विजयाबरोबरच यजमान संघाने मालिकेतील आव्हान कायम ठेवले आहे. यामध्ये पाहुणा संघ पहिले दोन सामने जिंकत मालिकेत २-१ने पुढे आहे. या मालिकेत भारताचा सलामीवीर इशान किशन (Ishan Kishan) भलताच फॉर्ममध्ये दिसला आहे.
इशानची या मालिकेतील कामगिरी पाहता त्याची आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये टी२० विश्वचषक खेळला जाणार आहे. या स्पर्धेसाठी इशान एक चांंगला पर्याय आहे असे मत भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाण (Irfan Pathan) याने व्यक्त केले आहे.
“दक्षिण आफ्रिकेची मालिका सुरू होण्यापूर्वी इशानने मागील काही सामन्यात वाईट कामगिरी केली होती. मात्र त्याने जोरदार पुनरागमन करत टीकाकरांना चांगलेच उत्तर दिले आहे. त्याने दबावामध्ये धमाकेदार कामगिरी केली आहे,” असे पठाणने म्हटले आहे.
इशान या डावखुऱ्या फलंदाजाने दिल्ली येथे झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात १५८.३३च्या स्ट्राईक रेटने ७६ धावा केल्या होत्या. त्याने तिसऱ्या सामन्यात ५४ धावा करत मालिकेतील दुसरे आणि कारकिर्दीतील चौथे अर्धशतक झळकावले. त्याने ३ सामन्यात ५४.६७च्या सरासरीने १६४ धावा केल्या आहेत.
“ऑस्ट्रेलियामध्ये चेंडू जास्त उसळी घेतो. तेथे उजवा-डावा हे फलंदाजीचे संयोजन फायद्याचे ठरणार आहे. इशानने आयपीएल २०२२च्या हंगामात अधिक धावा केल्या नाही. याने निराश न होता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने बॅटमधून धावांचा पाऊस केला आहे,” असेही पुढे पठाणने म्हटले आहे.
भारताने तिसऱ्या टी२० सामन्यात फलंदाजीबरोबर गोलंदाजीतही विशेष कामगिरी केली. या सामन्यात सलामीजोडी इशान-ऋतुराज गायकवाड यांनी अर्धशतके केली आहेत. त्यांनी पहिल्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी केली होती. ही भारतीय सलामीजोडीची दक्षिण आफ्रिकेविरुद्धची सर्वोत्तम भागीदारी ठरली आहे.
या सामन्यात भारताने २० षटकात १७९ धावा केल्या होत्या. भारताच्या उजव्या हाताच्या गोलंदाजांनी उत्तम कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना खेळपट्टीवर अधिक वेेळ तग धरू दिला नाही. युझवेंद्र चहलने ४ षटके टाकताना २० धावा देत ३ महत्वाच्या विकेट्स घेतल्या होत्या. त्याला हर्षल पटेलने चार विकेट्स घेत योग्य साथ दिली. भुवनेश्वर कुमारने ४ षटकात २१ धावा देत एक विकेट घेतली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
राजकोटमध्ये टीम इंडियाचे ‘गुजराती’ स्वागत, पाहा व्हिडीओ
भारताविरुद्धच्या टी२० मालिकेतून दक्षिण आफ्रिकेचा ‘हा’ प्रमुख खेळाडू झाला बाहेर
‘आता दबाव आफ्रिकी संघावर’, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने दिले भारतीय संघाला बळ