भारतीय संघाचा वरच्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर सध्या उत्कृष्ट कामगिरी करत आहे. आयपीएलमध्येही तो आपल्या दमदार फलंदाजीने प्रेक्षकांची मने जिंकतो. तसेच तो आयपीएलमधील फ्रंचायझी संघ दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार आहे.
श्रेयसची (Shreyas Iyer) खास गोष्ट म्हणजे तो सातत्यपूर्ण कामगिरी करतो. भारतीय संघाचे भविष्य म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. याचबरोबर सध्या घरी असलेला अय्यर ट्विटरवरुनही चांगली फटकेबाजी करत आहे.
अय्यरने भारतातील सर्वात मजेशीर क्रिकेटपटूचे नाव सांगितले आहे. झाले असे की, एका चाहत्याने ट्विटरवर अय्यरला प्रश्न विचारला की, भारतीय संघात सर्वात मजेशीर (Funny Cricketer) क्रिकेटपटू कोण आहे? या प्रश्नाचे उत्तर देताना अय्यरने भारतीय संघाचा फिरकीपटू गोलंदाज युजवेंद्र चहलचे (Yuzvendra Chahal) नाव घेतले.
Haha that would be @yuzi_chahal https://t.co/parXV8gl7b
— Shreyas Iyer (@ShreyasIyer15) March 25, 2020
चहल हा भारतीय संघाचा सर्वात मजेशीर क्रिकेटपटू आहे. तो सोशल मीडियावर मोठया प्रमाणात सक्रिय असतो. सध्या तो टिक टॉकवर व्हिडिओ अपलोड करून चर्चेचा विषय बनत आहे.
चहल हा भारतीय संघ सामना जिंकल्यानंतर चहल टीव्ही (Chahal TV Show) नावाचा एक कार्यक्रम देखील घेतो. ज्यामध्ये तो त्याच्या सहकारी खेळाडूंना मजेदार प्रश्न विचारतो आणि त्यांच्याबरोबर खूप मजा करतो. अय्यर आणि चहलमध्ये खूप चांगली मैत्री आहे. दोघेही एकमेकांची थट्टा मस्करी करत असतात.
ट्रेंडिंग घडामोडी-
-मदतीत मुंबईकर पुढे: मुंबई क्रिकेट संघटनेची मु्ख्यमंत्री रिलीफ फंडाला मदत
-मानाच्या रणजी ट्राॅफी स्पर्धेत सर्वाधिक द्विशतके करणारे ३ खेळाडू
-डिजे ब्राव्होनंतर गाण्यानंतर क्रिकेटर ड्वेन ब्रावोचे कोरोनावर नवे कोरे गाणे