भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. पहिल्यांदा फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात ५० षटकात ३७४ धावांचा डोंगर उभा केला आणि भारताला ३७५ धावांचे मोठे आव्हान दिले. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला ३०८ धावाच करता आल्या.
कोरोना महामारीच्या संकटानंतर भारतीय संघाचा हा पहिला अंतरराष्ट्रीय सामना होता. या सामन्याआध झालेल्या आयपील हंगामात ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन्ही संघातील काही खेळाडू सोबत खेळताना दिसून आले होते. त्यात काही खेळाडूंनी खूप चांगले प्रदर्शन केले तर काही खेळाडू आपला चांगला खेळ दाखवू शकले नाहीत.
ज्यावेळी संघाची निवड केली जाते, त्यावेळी खेळाडूने संघनिवड होण्याआधी झालेल्या काही स्पर्धांमध्ये कसे प्रदर्शन केलेलं आहे, याचा विचार केला जातो. पण याचा अर्थ असाही नाही कि एखाद्या खेळाडूने एखाद्या स्पर्धात खराब कामगिरी केली. म्हणजे येणाऱ्या स्पर्धेत पण तो खराब कामगिरी करेल. काही वेळा असेही होते, स्पर्धा बदली कि खेळाडूचे नशीब बदलून जाते. तसेच काही भारत व ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय सामन्यात दिसून आले.
या सामन्यात आयपीलमध्ये खराब कामगिरी करणाऱ्या ३ ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी जबरदस्त प्रदर्शन केले. त्याबद्दल या लेखात जाणून घेऊ.
१. ग्लेन मॅक्सवेल-
ग्लेन मॅक्सवेल आयपील २०२० मध्ये खराब कामगिरी करताना दिसून आला. त्याला पूर्ण आयपील हंगामात १३ सामन्यात एकही षटकार मारता आला नाही. त्याने या हंगामात १३ सामन्यात फक्त १०८ रन केले. त्याची सरासरी फक्त १५.४२ होती. तरी भारताविरोधात सिडनी येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याचा अंदाज वेगळाच दिसून आला. त्याने फलंदाजीला येताच चौफेर फटकेबाजीला सुरुवात केली. मॅक्सवेलने १९ चेंडूत ५ चौकार व ३ षटकार च्या मदतीने ४५ धावांची शानदार खेळी केली.
२. स्टीव स्मिथ-
स्टीव स्मिथने सुद्धा आयपीलमध्ये फार चांगले प्रदर्शन करताना दिसून आला नाही. त्याने आयपीलमध्ये १४ सामन्यात ३११ धावा केल्या, या उलट त्याने भारताविरोधात पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेगवान शतक केले. स्टीव स्मिथने ६२ चेंडूत आपले १०वे वनडे शतक पूर्ण केले. या सामन्यात त्याने ६६ चेंडूचा सामना करताना १०५ धावा केल्या.
३. ऍरॉन फिंच –
ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार ऍरॉन फिंच आयपीलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळत होता. तो संघातील एक प्रमुख खेळाडू होता. त्याच्यावर संघाला चांगली सुरुवात देण्याची जबाबदारी होती. ज्याप्रकारे तो संघातील प्रमुख खेळाडू होता. त्याप्रमाणात त्याचे तितके चांगले प्रदर्शन दिसून आले नाही. त्याने आयपीलमध्ये १२ सामन्यात २२.३३ च्या सरासरीने २६८ धावा केल्या. याउलट सिडनीमधील एकदिवसीय सामन्यात १२४ चेंडूत ११४ धावांची कर्णधाराला साजेशी अशी खेळी त्याने केली. फिंचने ११७ चेंडूत आपले १७वे एकदिवसीय शतक झळकावले. सोबतच त्याने आपल्या कारकीर्तीतील ५००० धावाही पूर्ण केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
धक्कादायक! पाकिस्तानचा सातवा खेळाडू ‘कोरोना पॉझिटिव्ह’, दौरा रद्द होण्याचे संकट
प्रो कबड्डी लीगचे आठवे पर्व ढकलले पुढे, आता ‘या’ वर्षी होणार स्पर्धा
“मनीष पांडे दुर्दैवी”, हार्दिकला संघात स्थान दिल्याबद्दल माजी दिग्गजाचे रोखठोक मत