न्यूझीलंडचा उंच काठीचा वेगवान गोलंदाज कायल जेमिसन हा भारतीय फलंदाजांसाठी नेहमीच कर्दनकाळ ठरला आहे. मागील कानपूर कसोटीत तर या ६ फूट ८ इंचीच्या गोलंदाजाने भारताच्या ६ फलंदाजांना पव्हेलियनचा रस्ता दाखवला होता. त्यामुळे मुंबई कसोटीतही तो भारतीय फलंदाजांसाठी घातक ठरेल असे वाटत होते. परंतु याच जेमिसनचे भारताचा युवा सलामीवीर शुबमन गिल याने मात्र धूमधडाक्यात स्वागत केले आहे. त्याने जेमिसनला सुरुवातीच्या षटकांमध्येच भरपूर चोप दिला आहे, ज्याचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.
त्याचे झाले असे की, न्यूझीलंडकडून गोलंदाजीची सुरुवात करण्यासाठी टीम साऊदी आला होता. त्याने आपले पहिलेच षटक निर्धाव टाकले. त्यानंतर दुसऱ्या षटकात जेमिसन गोलंदाजीसाठी आला होता. जेमिसनच्या या डावातील पहिल्यावहिल्या षटकातच शुबमन आपले हात धुवून घेतले. जेमिसनचा षटकातील पहिलाच चेंडू हाफ वॉलीचा होता, ज्यावर शुबमनने शानदार शॉट खेळला आणि मिडविकेटच्या वरुन चेंडूला चौकारासाठी पाठवले. त्यानंतर पुढील दुसऱ्या चेंडूवरही त्याने अजून एक चौकार लगावला.
विशेष म्हणजे, इतक्यावरच शुबमनने समाधान मानले नाही. त्याने याच षटकातील शेवटच्या, सहाव्या चेंडूवर अजून एक खणखणीत चौकार खेचला. अशाप्रकारे ३ चौकारांसह त्याने या षटकात एकूण १२ धावा जमवल्या.
SACHIN… SACHIN… chants
Because… Shubman Gill hit Jamieson for 2 fours in a row 😂🙈
Connect the dots… #INDvsNZ pic.twitter.com/kUivjvzcMF
— Vinesh Prabhu (@vlp1994) December 3, 2021
परंतु शुबमनच्या या आक्रमक खेळीवर लवकरच पूर्णविराम लागला. न्यूझीलंडचा फिरकीपटू अजाज पटेल याने गिलला ४४ धावांवर पव्हेलियनला धाडले. ७१ चेंडूंचा सामना करताना ७ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने त्याने या धावा केल्या. मात्र अजानने त्याने रॉस टेलरच्या हातून झेलबाद करत त्याच्या अर्धशतकावर पाणी फेरले.
WATCH – 4,4,4 : @ShubmanGill off to a fiery start.
📹📹https://t.co/ACvUGDBV5K #INDvNZ @Paytm pic.twitter.com/2kgJMsE8gh
— BCCI (@BCCI) December 3, 2021
शुबमननंतर भारताचे फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहलीही लगेचच तंबूत परतले. त्या दोघांना भोपळाही फोडता आला नाही. परंतु सलामीवीर मयंक अगरवाल याने संयमी खेळी करत पहिल्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रापर्यंत शतक झळकावले आहे. डॅरिल मिचेलच्या ५९ व्या षटकातील पहिल्या चेंडूवर चौकार मारत त्याने धावांची शंभरी गाठली आहे. त्याच्याबरोबर यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा यानेही एक बाजू धरून ठेवली आहे. तो सध्या २० धावांवर खेळतो आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IND V NZ 2nd Test Live: मयंक अगरवालचा शतकी दणका; भारताच्या ५९ षटकात ४ बाद १९३ धावा
मुंबई कसोटीतून पुनरागमन करत ‘कर्णधार’ विराटने धोनीला सोडले मागे, ‘या’ विक्रमात बनला नंबर १
INDvNZ: दुसर्या कसोटी सामन्यातील भारताच्या ‘या’ शिलेदाराबद्दल माहितीये का? पराक्रम वाचून शॉक व्हाल