पुणे। फर्ग्युसन कॉलेज टेनिस अकादमी तर्फे आयोजित व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या चौथ्या सांघिक आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत विजेतेपदासाठीच्या लढतीत टायगर्स संघाने डेक्कन चार्जर्स संघाचा 23-15 असा पराभव करत विजेतेपद संपादन केले.
फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत टायगर्स संघाने डेक्कन चार्जर्स संघाचा 23-15 असा सहज पराभव करत विजेतेपद पटकावले. सामन्यात संघर्षपुर्ण लढतीत 100 अधिक गटात टायगर्सच्या प्रशांत गोसावी व ऋतू कुलकर्णी यांना डेक्कन चार्जर्सच्या आशिष पुंगलिया व जयदीप दाते यांच्याकडून 6-5(7-4) असा पराभव पत्करावा लागला. मात्र, 90 अधिक गटात टायगर्स संघाच्या परज नाटेकर व योगेश पंतसचिव या जोडीने डेक्कन चार्जर्सच्या अमोद वाकलकर व अजित सैल यांचा 6-4 असा पराभव करत आघाडी कायम राखली. त्यानंतर खुल्या गटात अभिषेक ताम्हाणे व केदार शहा यांनी आशिष पुंगलिया व मुकुंद जोशी यांचा 6-2 असा तर अखेरच्या खुल्या गटात टायगर्सच्या अनुप मिंडा व ऋतू कुलकर्णी यांनी ऋषिकेश पाटसकर व रक्षय ठक्कर यांचा 6-3 असा पराभव करून संघाला विजेतेपद मिळवून दिले.
स्पर्धेतील विजेत्या टायगर्स संघाला करंडक व 20000/- रुपये तर, उपविजेत्या डेक्कन चार्जर्स संघाला करंडक व 10,000/-रुपये अशी पारितोषिक देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण मुकुंद जोशी आणि डॉ. अमित पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आले.
निकाल: अंतिम फेरी:
टायगर्स वि.वि. डेक्कन चार्जर्स 23-15(100अधिक गट: प्रशांत गोसावी/ऋतू कुलकर्णी पराभूत.वि. आशिष पुंगलिया/जयदिप दाते 5-6(4-7); 90अधिक गट: परज नाटेकर/योगेश पंतसचिव वि.वि.अमोद वाकलकर/अजित सैल 6-4; खुला गट: अभिषेक ताम्हाणे/ केदार शहा वि.वि आशिष पुंगलिया/मुकुंद जोशी 6-2 ; खुला गट: अनुप मिंडा /ऋतू कुलकर्णी वि.वि.ऋषिकेश पाटसकर/रक्षय ठक्कर 6-3.
महत्त्वाच्या बातम्या –
थाला कमिंग! आयपीएल विजेतेपद राखण्यासाठी धोनीचे सीएसके कॅम्पमध्ये आगमन
जमशेदपूरचे लक्ष्य विजयी ‘पंचका’चे; आज ओदिशाशी गाठ
Video: विश्वचषकापूर्वी भारतीय संघात दिसला जोश! हरनप्रीतने केला भांगडा, तर यास्तिकाचे जोरदार ठूमके