मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात गुरुवारी (१२ मे) आयपीएल २०२२चा ५९वा सामना खेळला गेला. प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या मुंबईने चेन्नईला या सामन्यात ५ विकेट्स राखून पराभूत केले. मुंबईच्या या विजयात डॅनियल सॅम्सबरोबरच युवा फलंदाज तिलक वर्मा याचाही मोठा हात होता. त्याने संघासाठी महत्त्वपूर्ण खेळी करत १५व्या षटकातच संघाला बाजी मारून दिली. त्याच्या छोटेखानी खेळीसह त्याने मोठा विक्रमही केला आहे.
तिलकने (Tilak Varma) चेन्नईच्या ९८ धावांच्या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना नाबाद ३४ धावा केल्या. ३२ चेंडू खेळताना ४ चौकारांच्या मदतीने त्याने ही अभेद्य खेळी केली. त्याच्या या छोटेखानी खेळीसह त्याने दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत (Rishabh Panr) याचा ५ वर्षे जुना विक्रम मोडला (Tilak Varma Broke Rishabh Pant Record) आहे. तिलक एका आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करणारा सर्वात युवा फलंदाज (Most Runs In IPL Season By Teenager) ठरला आहे.
तिलक आता फक्त १९ वर्षांचा असून त्याने मुंबईकडून चालू हंगामात १२ सामने खेळताना ४०.८९च्या सरासरीने ३६८ धावा केल्या आहेत. यासह तो एका आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करणारा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे. त्याच्यापूर्वी पंतच्या नावावर हा विक्रम होता. त्याने २०१७ मध्ये दिल्ली संघाचे प्रतिनिधित्त्व करताना १४ सामन्यांमध्ये ३६६ धावा केल्या होत्या. आता तिलकने त्याला मागे सोडले आहे.
याबरोबरच २०१९ मध्ये दिल्लीकडूनच ३५३ धावा करणारा पृथ्वी शॉ या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. तर संजू सॅमसन चौथ्या क्रमांकावर असून त्याने २०१४ मध्ये राजस्थान संघाकडून ३३९ धावा केल्या होत्या.
मुंबई इंडियन्सकडूनही केल्या आहेत सर्वाधिक धावा
युवा फलंदाज तिलक वर्माने आयपीएलच्या चालू हंगामात मुंबईकडून धडाकेबाज फलंदाजी केली आहे. तो आपल्या ३६८ धावांसह मुंबईकडून सर्वाधिक धावा करणारा पहिला फलंदाज आहे. त्याच्यानंतर सलामीवीर इशान किशन दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने १२ सामने खेळताना ३२७ धावा केल्या आहेत. तसेच सूर्यकुमार यादव केवळ ८ सामने खेळूनही ३०३ धावांसह या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2022। चेन्नईचा काटा काढल्यानंतर तिलक वर्माने मैदानातच कुणासाठी जोडले हात? घ्या जाणून
लॅब्यूशेनचा शॉर्ट बॉल झेलू शकला नाही स्टोक्स, धापकन मैदानावर कोसळला इंग्लंडचा नवा कर्णधार
सीएसकेला मुंबई इंडियन्सविरुद्ध का पाहावी लागली हार, ‘ही’ आहेत ३ कारणे