---Advertisement---

INDvsAUS | ‘हा’ फलंदाज ऑस्ट्रेलियासाठी ठरेल ‘एक्स-फॅक्टर’, माहेला जयवर्धनेची मोठी प्रतिक्रिया

On: मंगळवार, सप्टेंबर 20, 2022 4:15 PM
Mahela Jayawardene
---Advertisement---

श्रीलंकेचा माजी कर्णधार माहेला जयवर्धने याच्या मते ऑस्ट्रेलियन संघाकडे एक असा फलंदाज आहे, जो भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेत धमाकेदार प्रदर्शन करू शकतो. ऑस्ट्रेलियन संघासाठी टिम डेविड ‘एक्स-फॅक्टर’ ठरेल असे जयवर्धने याला वाटते. डेविड मंगळवारी (20 सप्टेंबर) भारताविरुद्ध सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20  मालिकेत ऑस्ट्रेलियन संघासाठी पदार्पण करू शकतो. त्याने यापूर्वी 2019 आणि 2020 मध्ये सिंगापूर संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच टी-20 लीगमध्ये त्याने पावर हिटर आणि फिनिशरच्या रूपात स्वतःला सिद्ध केले आहे.

माहेला जयवर्धने (Mahela Jayawardene) आयसीसी रिव्यू शोमध्ये बोलत होता. यावेळी तो म्हणाला की, “मला वाटते त्यांच्याकडे चांगले पावर हिटर खेळाडू असतील. मला वैयक्तिक असे वाटते की, त्याच्यासाठी (टिम डेविड) सहावा क्रमांक चांगला असेल. ऑस्ट्रेलियाकडे खूप उत्कृष्ट लाईनअप आहे, जी त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. त्याने फ्रँचायझी क्रिकेटमध्ये मोठ्या खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूम शेअर केले आहे. तो एक चांगला खेळाडू आहे. तो ड्रेसिंग रूममध्ये स्वतःला सर्वांसोबत सामावून घेऊ शकतो. टिम पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करणार आहे. विश्वचषकात त्याच्यापुढे खूप आव्हाने असतील. पण त्याचे कुटुंब आणि मित्रांसाठी ही चांगली गोष्ट आहे.”

जयवर्धने आयपीएलची सर्वात यशस्वी फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षक आहेत. आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्ससोबत असताना जयवर्धने आणि टिम डेविड (Tim David) यांचा नजिकचा संबंध आला होता. डेविडने या हंगामात मुंबई संघासाठी आठ सामने खेळले आणि यादरम्यान 216.27 च्या स्ट्राईक रेटने 186 धावा केल्या होत्या. आता भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेत डेविड काय कमाल दाखवतो हे पाहावे लागणार आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या या भारत दौऱ्यात त्यांचे काही प्रमुख खेळाडू उपलब्ध नाहीत. सलामीवीर डेविड वॉर्नरला विश्रांती दिली गेली आहे. तर मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस आणि मिचेल मार्श यांना दुखापतीतून सावरण्यासाठी संघातून बाहेर ठेवले गेले आहे. मालिकेतील पहिला सामना 20 सप्टेंबर, दुसरा सामना 23 सप्टेंबर आणि तिसरा सामना 25 सप्टेंबर रोजी खेळळा जाईल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या – 

INDvAUS: पहिल्याच टी20 सामन्यात लागणार रेकॉर्ड्सची रांग! विराटकडे कॅप्टन रोहितला मागे टाकण्याची संधी
ठरलं एकदाचं, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात टीम इंडियाची ‘हीच’ जोडी उतरणार ओपनिंगला!
न्यूझीलंडने टी20 वर्ल्डकपसाठी जाहीर केला संघ, केंद्रीय करार धुडकावून लावणाऱ्या खेळाडूंचाही समावेश  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---