मेलबर्न। भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसरा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरु आहे. या सामन्यात तिसऱ्या दिवसाखेर भारताने दुसऱ्या डावात 5 बाद 54 धावा केल्या आहेत. तसेच या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 151 धावांवर संपुष्टात आला आहे. भारत 346 धावांनी आघाडीवर आहे.
या सामन्याच्या दुसऱ्या दिवशीप्रमाणे आजही ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनची यष्टीमागून बोलत सतत भारतीय फलंदाजांचे लक्ष विचलित करण्याचे प्रयत्न चालू होते. त्यातील त्याचा रिषभ पंत बरोबरील संवात स्टंप माइकमधून ऐकायला मिळाला आहे.
भारताच्या दुसऱ्या डावात 44 धावांतच 5 विकेट्स गेल्या. त्यामुळे रिषभ पंतला लवकर फलंदाजीला यावे लागले. त्यावेळी 26 व्या षटकादरम्यान नॅथन गोलंदाजी करत असताना पेनने पंतला यष्टीरक्षक एमएस धोनीचे मर्यांदीत षटकांसाठी भारतीय संघाच पुनरागमन झाल्याची आठवण करुन देताना टोमणा मारला आहे.
तो पंतला म्हणाला, ‘एमएस धोनी वनडे संघात परत आला आहे. त्यामुळे तू बीबीएलमध्ये हॅरिकेन संघात खेळू शकतो. त्यांना फलंदाजाची गरज आहे.’
‘तूझा ऑस्ट्रेलियातील सुट्टीचा वेळही वाढेल. होबार्ट हे सुंदर शहर आहे. तूला शानदार आपार्टमेंटही मिळेल.’ तसेच तो पुढे म्हणाला, ‘तू माझ्या मुलांना सांभाळू शकतो का, जेणेकरुन मी माझ्या पत्नीला घेऊन चित्रपट पहायला जाऊ शकतो.’
Tim Paine doing some recruiting for the @HurricanesBBL out in the middle of the 'G… 😂 #AUSvIND pic.twitter.com/6btRZA3KI7
— cricket.com.au (@cricketcomau) December 28, 2018
याआधी पेनने या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रोहित शर्माला स्लेजिंग करताना म्हटले होते की ‘मी राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यापैकी कोणाला पाठिंबा द्यावा याबाबत गोंधळलेला असतो. पण जर तू आज षटकार मारला तर मी मुंबईला पाठिंबा देईल.’
"If Rohit hits a six here I'm changing to Mumbai" 😂#AUSvIND pic.twitter.com/JFdHsAl84b
— cricket.com.au (@cricketcomau) December 27, 2018
तसेच पंतनेही अॅडलेड येथे झालेल्या सामन्यात पेनला स्लेज केले होते.
महत्त्वाच्या बातम्या:
–तब्बल ३५ वर्षांनी आली टीम इंडियावर एवढी मोठी नामुष्की
–१२ वर्षांपूर्वी कुंबळेने केलेला विक्रम बुमराह, शमीकडून मोडीत
–जसप्रीत बुमराह कसोटीत अशी कामगिरी करणारा पहिला आशियाई गोलंदाज