इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम २९ सामन्यांनंतर ४ मे रोजी अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला. आयपीएल संघांच्या बोयोबबलमध्ये कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर सर्व परदेशी खेळाडूंना मायदेशी परतण्यास सांगण्यात आले होते. मात्र, मायदेशी जाण्याच्या आधी झालेल्या एका कोरोना चाचणी न्यूझीलंडचा खेळाडू टीम सिफर्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळे त्याचे अन्य न्यूझीलंडचे सहकारी मायदेशी परतले असले तरी त्याला मात्र, भारतातच उपचारासाठी थांबावे लागले. आता या अनुभवांबद्दल त्याने माहिती दिली आहे.
आयपीएल २०२१ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा भाग असलेला सिफर्ट कोरोनातून बरा झाला असून आता मायदेशी देखील परतला आहे. पण सध्या तो त्याच्या घरी १४ दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये आहे. यादरम्यान त्याने एका ऑनलाईन चर्चेत सहभाग घेतला होता. या चर्चेदरम्यान त्याचा अनुभव सांगताना त्याला त्याचे अश्रू थांबवता आले नाहीत.
सिफर्ट जेव्हा कोरोना पॉझिटिव्ह आढळला तेव्हा, त्याचे उपचार चेन्नईमध्ये मायकल हसीबरोबर झाले. चेन्नई सुपर किंग्स संघाचे फलंदाजी प्रशिक्षकपद सांभाळणारा हसी देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. तो देखील आता बरा झाला असून मायदेशी ऑस्ट्रेलियाला परतला आहे.
सिफर्ट म्हणाला की ‘जेव्हा मला समजले की मी कोरोना पॉझिटिव्ह आहे, तेव्हा माझ्यासाठी सर्व जग थांबल्यासारखे मला वाटले. मी पुढे काय होईल याचा विचारच करु शकत नव्हतो की पुढे काय होणार आहे. सर्वात भितीदायक भाग म्हणजे तुम्ही वाईट गोष्टी ऐकता आणि विचार करता की आपल्याबरोबरही असेच होणार आहे.’
https://twitter.com/Kiwiyash_/status/1397085545642151939
या चर्चेदरम्यान डोळ्यांत पाणी आलेला सिफर्टने नंतर स्वत:ला सावरले. त्याने या कठिण काळात केकेआरचा प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम आणि सीएसकेचा प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांनी मदत केल्याचे सांगितले.
तो म्हणाला, ‘त्यांनी सर्वकाही सोपे केले. त्यांनी सुनिश्चित केले की सर्व गोष्टी योग्यपद्धतीने होतील. सीएसकेच्या व्यवस्थापनाने आणि केकेआरच्या सीईओ यांनी माझ्यासाठी हे जाणून घेण्यास सोपे केले की सर्वकाही ठिक होईल. जेव्हा माझी घरी परतण्याची वेळ झाली तेव्हा त्यांनी मला घरी सुरक्षित पोहचवण्यासाठी शक्य असलेले सर्व प्रयत्न केले.’
तो पुढे म्हणाला, ‘हे नक्कीच कठीण होतो. पण काही दिवस गेल्यानंतर सर्व थोडे शांत झाले. मला इतके माहित होते की मला यातून जावेच लागणार आहे आणि सकारात्मकता ठेवावी लागणार आहे.’
What gets Tim Seifert through days in quarantine? 🥘
He’ll fill you in as he counts down to his MIQ release mid next week 👍#CricketNation #Cricket pic.twitter.com/QO9BK7U1bf
— BLACKCAPS (@BLACKCAPS) May 25, 2021
सिफर्ट दोन महिन्यांनी लग्न करणार असल्याने आणि नियोजित वेळेपेक्षा लवकर मायदेशी परतल्याने त्याची होणारी पत्नी खूश असल्याचेही त्याने सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या –
क्लार्क म्हणतो, ‘हा’ भारतीय जगातील सर्वोत्तम फलंदाज; तर अख्तर सर्वात वेगवान गोलंदाज
क्वारंटाईनमध्ये वेळ घालवण्यासाठी चेतेश्वर पुजाराला मिळाली सर्वात ‘क्यूट’ गेमिंग पार्टनर, पाहा फोटो
जेव्हा विराट कोहलीने सांगितले होते, ‘जडेजा आहे सर्वात खोटारडा व्यक्ती’; जुना व्हिडिओ होतोय व्हायरल