---Advertisement---

सचिनला जे काम २०० कसोटीत जमले ते या गोलंदाजाने ६६ कसोटीतच केले

On: शनिवार, ऑगस्ट 17, 2019 1:21 PM
---Advertisement---

श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड संघात गाले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडीयमवर पहिला कसोटी सामना 14 ऑगस्टपासून सुरु झाला आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा गोलंदाज टीम साऊथीने फलंदाजी करताना खास पराक्रम केला आहे.

साऊथीने या सामन्यात पहिल्या डावात 19 चेंडूत 14 धावा केल्या.  यामध्ये त्याच्या एका षटकाराचा समावेश आहे. त्यामुळे आता त्याचे कसोटीमध्ये 66 सामन्यात 69 षटकार झाले आहेत.

त्यामुळे त्याने कसोटीमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत 17 व्या क्रमांकावर असणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची बरोबरी केली आहे. सचिनने 200 कसोटी सामन्यात 69 षटकार मारले आहेत.

या यादीत अव्वल क्रमांकावर न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्यूलम असून त्याने 101 कसोटी सामन्यात 107 षटकार मारले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर 100 षटकारांसह ऍडम गिलख्रिस्ट आहे. विशेष म्हणजे कसोटीत 100 किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मॅक्यूलम आणि गिलख्रिस्ट यांनाच मारता आले आहेत.

श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड संघातील पहिल्या कसोटीत न्यूझीलंडला पहिल्या डावात सर्वबाद 249 धावसंख्या उभारता आली. त्यानंतर श्रीलंकेने पहिल्या डावात सर्वबाद  267 धावा करत 18 धावांची आघाडी घेतली.

18 धावांच्या पिछाडी नंतर न्यूझीलंडने दुसऱ्या डावात सर्वबाद 285 धावा केल्या असून श्रीलंकेला विजयासाठी 268 धावांचे आव्हान दिले आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

संपूर्ण यादी: आत्तापर्यंत या दिग्गजांनी सांभाळले आहे टीम इंडियाचे प्रशिक्षकपद!

शास्त्रींची मुख्य प्रशिक्षकपदी निवड केल्यानंतर कपिल देव म्हणाले…

या एका शब्दात श्रेयस अय्यरने केले स्वत:च्या खेळीचे कौतुक, पहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment