आयपीएल गवर्निंग कांउसिलची आज (२ ऑगस्ट) बैठक होणार आहे. या बैठकीदरम्यान युएईत होणाऱ्या आयपीएलचे वेळापत्रक आणि स्टॅन्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) अंतिम केले जाईल. असे असले तरी, अजूनही भारताबाहेर आयपीएलचे आयोजन करण्यासाठी भारत सरकारने संमती दिलेली नाही. परंतु, काउंसिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी आश्वासन दिले आहे की, लवकरच संमती मिळेल. Today IPL Governing Council Will Take Some Final Decisions In Meeting
आज होणाऱ्या बैठकीमध्ये युएईतील कोणत्या मैदानावर सामने होतील, दर्शकांना येण्याची अनुमती मिळेल का नाही, युएईला जाण्यापुर्वी अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर भारतीय संघाचा शिबीर लावला जाईला का आणि खेळाडूंसोबत त्यांची पत्नी किंवा कुटुंब जाऊ शकतील का नाही, अशा प्रश्नांवर चर्चा केली जाईल.
शिवाय, दक्षिण आफ्रिकेतील खेळाडूंविषयीही चर्चा केली जाईल. कारण, सध्या दक्षिण आफ्रिकामध्ये कोव्हिड-१९ची प्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. त्यामुळे तेथे परदेशी यात्रावर बंदी घालण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेचे १० खेळाडू आयपीएलमधील संघांचा भाग आहेत. त्यामुळे या खेळाडूंना कसे सहभागी करता येईल? हा विषयदेखील महत्त्वाचा आहे.
एसओपी मिळाल्यानंतर फ्रंचायझी तयार करतील सराव वेळापत्रक –
आयपीएल गवर्निंग कांउसिल फ्रंचायझीसोबत एसओपी शेअर करु शकते. कारण, एसओपीविना संघ सराव करु शकत नाहीत. आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स संघाला १२ ऑगस्टपर्यंत युएईला जायचे आहे. इतर संघांना आयपीएलच्या एक महिन्याआधी शिबिर घ्यायचा आहे. एका फ्रंचायझी अधिकाऱ्याने म्हटले आहे की, “आम्ही अपेक्षा करतो की बैठकीमध्ये आम्हांला एसओपी सांगितला जाईल. त्यानंतर आम्ही सरावाचे वेळापत्रक आणि युएईला जाण्याची तारीख निश्चित करु.”
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या ३० खेळाडूंच्या सहभागावर प्रश्नचिन्ह –
बैठकीच्या अजेंडामध्ये लॉजिस्टिक हा एक मोठा मुद्दा असतो. कारण, इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात होणारी वनडे मालिका आयपीएल सुरु होण्याच्या ३ दिवस आधी म्हणजे १६ सप्टेंबरला संपणार आहे. आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या १७ आणि इंग्लंडच्या १३ खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे हे खेळाडू कशाप्रकारे लीगमध्ये सहभागी होतील, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.
खेळाडू बायो सिक्योर प्रोटोकॉल तोडू शकणार नाहीत –
बीसीसीआयने आयपीएलसाठी एसओपी तयार केला आहे, त्यामध्ये १४ दिवसांत खेळाडूंच्या ४ कोरोना चाचणी होतील. तसेच, ड्रेसिंग रुममध्ये १५ पेक्षा जास्त खेळाडू नसतील. केवळ खेळाडूंनाच नव्हे तर, त्यांची पत्नी अथवा प्रेयसी आणि फ्रंचायझीच्या मालकांनाही या बायो सिक्योर प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल. कुणीही हा प्रोटोकॉल तोडू शकत नाही. जर, तोडल्यास तो खेळाडू संघात पुन्हा सहभागी होऊ शकणार नाही.
खेळाडूंसोबत त्यांची पत्नी किंवा प्रेयसी जाऊ शकेल का नाही –
खेळाडूंसोबत त्यांची पत्नी अथवा प्रेयसी युएईला जाईल का नाही, हे फ्रंचायझी ठरवतील. बीसीसीआय या प्रकरणात हस्तक्षेप करणार नाही. परंतु, बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की, बायो सिक्योर प्रोटोकॉल सर्वांसाठी बंधनकारक आहेत. मग तो संघाचा बस ड्राइव्हर असो वा कुणीही असो.
महत्त्वाच्या बातम्या –
अनिल कुंबळेनी ‘मंकीगेट’ प्रकरणावर केले मोठे भाष्य; म्हणाला…
वाढदिवस विशेष : आपले रक्त देऊन भारतीय कर्णधाराचा जीव वाचवणारा वेस्ट इंडिजचा दिलदार दिग्गज
वेस्ट इंडीज संकटात; या देशाने दौरा केला रद्द
ट्रेंडिंग लेख –
या ५ गोलंदाजांनी आयपीएलच्या इतिहासात टाकले आहेत सर्वाधिक डॉट बॉल
लग्न न करताच वडील होणारे हे आहेत ४ क्रिकेटपटू
आयपीएल २०२० ठरु शकतो या ५ खेळाडूंचा शेवटचा आयपीएल हंगाम