टोकियो ऑलिंपिक २०२० च्या पाचव्या दिवशी (२७ जुलै) झालेल्या ट्रायथलॉन स्पर्धेत बरमूडा देशाच्या महिला खेळाडूने मोठी कामगिरी केली. या स्पर्धेत ३३ वर्षीय फ्लोरा डफीने ग्रेट ब्रिटन आणि अमेरिकन खेळाडूंना धूळ चारत आपल्या देशाला टोकियो ऑलिंपिक २०२० मधील पहिले वहिले सुवर्ण पदक जिंकून दिले. यासह बरमूडा हा ऑलिंपिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा सर्वात छोटा देश ठरला आहे.
तिने ग्रेट ब्रिटनच्या जॉर्जिया टेलर- ब्राऊन आणि अमेरिकेच्या कॅटी झॅफेरसला या शानदार शर्यतीत पराभूत करत आपल्या देशासाठी दुसरे ऑलिंपिक पदक जिंकले. (Tokyo Olympic Bermuda becomes smallest country to win Olympic gold after Flora Duffy’s emotional triathlon triumph)
Golden glory!
Flora Duffy wins the women's #Triathlon – it's #BER's first ever Olympic gold!@WorldTriathlon pic.twitter.com/stRcyD1uoo
— The Olympic Games (@Olympics) July 26, 2021
फ्लोराच्या या कामगिरीने बरमूडा हा टोकियो ऑलिंपिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान देश बनला आहे. या देशाची लोकसंख्या जवळपास ७० हजार आहे. याव्यतिरिक्त तिने ट्रायथलॉनमध्ये व्यापलेले अंतर संपूर्ण बरमूडा देशाच्या आकारापेक्षा जास्त आहे.
बरमूडाचे प्रतिनिधित्व करणारी फ्लोराने १५०० मीटर स्विमिंग, ४० किलोमीटरची सायकल चालविणे आणि १० किलोमीटर धावणे, असे एकूण ५१.१ किमीचे अंतर १ तास ५५ मिनिटे ३६ सेकंदात पूर्ण करत महिलांच्या ट्रायथलॉन स्पर्धेत पहिले सुवर्ण पदक जिंकले केले. ही वेळ रौप्य पदक विजेती जॉर्जिया टेलर- ब्राऊन (१:५६:५०) आणि कांस्य पदक विजेती कॅटी झॅफेरस (१:५७:०३) पेक्षा सर्वोत्तम होती.
FLORA DUFFY 🇧🇲 IS OUR NEW OLYMPIC CHAMPION!
What a run from the Bermudian to take the tape by over a minute & win the #Tokyo2020 gold she craved.
Georgia Taylor-Brown 🇬🇧 overcomes a late puncture to earn silver, Katie Zaferes 🇺🇸 with bronze!#Tokyo2020Triathlon #Triathlon pic.twitter.com/dkWQUA8lbB— World Triathlon (@worldtriathlon) July 26, 2021
डफीच्या यशाचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, ती आपल्या देशाची पहिली ऑलिंपिकमध्ये सुवर्ण पदक विजेती आहे. यासोबतच इतिहासातील ती केवळ दुसरी पदक विजेती आहे. यापूर्वी बरमूडाने मोंट्रियल ऑलिंपिक १९७६ मध्ये पदक जिंकले होते. ग्रेट ब्रिटन आणि अमेरिकासारख्या मजबूत देशांना पछाडत तिने स्पर्धेत शानदार कामगिरी केली.