आंतरराष्ठ्रीय कसोटी क्रिकेटमध्ये अनेक फलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करून अनेक रेकाॅर्ड्स रचले आहेत. पण कसोटीमध्ये त्रिशतक झळकावणे ही कोणत्याही पलंदाजांसाठी साधी गोष्ट नाही. काही फलंदाजांनी कसोटीमध्ये आक्रमक अंदाजात फलंदाजी करत सर्वाधिक त्रिशतके झळकावली आहेत. या बातमीद्वारे आपण अशा 5 फलंदाजांबद्दल जाणून घेऊया ज्यांनी हा पराक्म केला आहे.
1) डाॅन ब्रॅडमन- ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज डॉन ब्रॅडमनच्या (Don Bradman) नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 2 त्रिशतक ठोकण्याचा रेकाॅर्ड आहे. ब्रॅडमनने दोन्ही त्रिशतके इंग्लंडविरुद्ध झळकावली आहेत. ब्रॅडमनने 52 कसोटी सामन्यांमध्ये 99.94च्या सरासरीने 6,996 धावा केल्या, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 334 राहिली.
2) वीरेंद्र सेहवाग- भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) कसोटी क्रिकेटमध्ये 2 त्रिशतके झळकावली आहेत. सेहवागने पाकिस्तानविरुद्ध एक तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसरे त्रिशतक झळकावले आहे. त्याने 104 कसोटी सामन्यांमध्ये 49.34च्या सरासरीने 8,586 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 319 राहिली आहे.
3) ख्रिस गेल- वेस्ट इंडिजचा दिग्गज सलामीवीर ख्रिस गेलनेही (Chris Gayle) कसोटी क्रिकेटमध्ये 2 त्रिशतके झळकावली आहेत. गेलने दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेविरुद्ध त्रिशतक झळकावले आहे. त्याने 103 कसोटी सामन्यांमध्ये 42.18च्या सरासरीने 7,214 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 333 आहे.
4) ब्रायन लारा- वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारानेही (Brian Lara) कसोटी क्रिकेटमध्ये 2 त्रिशतके झळकावली आहेत. त्याने दोन्ही त्रिशतके इंग्लंडविरुद्ध झळकावली आहेत. लाराने 131 कसोटी सामन्यांमध्ये 52.88च्या सरासरीने 11,953 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 400 राहिली आहे.
5) करूण नायर- भारतीय फलंदाज करुण नायरनेही (Karun Nair) कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावले आहे. नायरने इंग्लंडविरुद्ध त्रिशतक झळकावले होते. त्याने 6 कसोटी सामन्यांमध्ये 62.33च्या सरासरीने 374 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 303 आहे. या 5 फलंदाजांशिवाय जगातील 23 फलंदाजांनी कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक ठोकले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मोहम्मद शमीचा टीम इंडियात कमबॅक कधी? स्वत: दिलं मोठं अपडेट
बांगलादेशच्या गोलंदाजांची आता खैर नाही! कडक सिक्स मारत विराटने सराव सत्रादरम्यान तोडली भिंत
‘या’ दिग्गजाचे रेकाॅर्ड मोडून अश्विन होणार निवृत्त? केले खळबळजनक वक्तव्य