– सचिन अमुनेकर
आजच्या झटपटीच्या काळात लोकांना सगळ्या गोष्टी झटपट हव्या असतात. त्याला क्रिकेट हा खेळही अपवाद राहीला नाही. क्रिकेटची सुरवात ही कसोटी या पाचदिवसीय प्रकाराने चालू झाली. कालांतराने यात बदल होऊन क्रिकेट हे एकदिवसीय आणि नंतर २०-२०या प्रकारातही खेळले जाऊ लागले. आता तर १०० चेंडूंचे सामने किंवा १० षटकांचे टी१० देखील सुरु झाले आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये एखाद्या खेळाडूला यशस्वी होण्यासाठी त्याला तांत्रिकदृष्ट्या खूप परिपक्व असायला हवे. क्रिकेटच्या या प्रकारात दोन-दोन दिवस मैदानात गोलंदाजांसमोर धैर्याने व आत्मविश्वासाने उभे राहावे लागते. कधी धावा जमवायचा असतात तर कधी संघाची परिस्थिती पाहून फक्त किल्ला लढवायचा असतो. यात खेळात खेळाडूंची खरी कसोटी लागते.
काही दिग्गज खेळाडूंनी खूप लवकर कसोटी क्रिकेट खेळणे सोडून दिले तर काही खेळाडूंनी या परिस्थितीवर मात करून अफाट यश मिळवले. खूप साऱ्या फलंदाजानी खोऱ्याने धावा काढल्यात, काहींनी तर द्विशतके बनवण्याचा विक्रमच प्रस्थापित केला. अनेक चाहत्यांना प्रश्न पडतो की खेळाडूंनी केलेली द्विशतके शतक म्हणून दोन वेळा मोजली जातात का? तर याचे उत्तर नाही असे आहे. ते केवळ १ शतक म्हणून विक्रमात मोजले जाते.
आज आपण जाणून घेणार आहोत अश्याच फलंदाजांना ज्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त द्विशतके झळकावली आहेत.
६. महेला जयवर्धने
श्रीलंकेचा दिग्गज आणि माहान खेळाडू महेला जयवर्धने याने आपल्या कसोटी कारकिर्दीत ७ वेळा द्विशतके मारण्याचा पराक्रम केला आहे. त्याने १४९ कसोटी सामन्यात ३४ शतके आणि ५० अर्धशतकांच्या जोरावर ११, ८१४ धावा आपल्या नावावर केल्या आहेत .
५. विराट कोहली
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने या यादीत खूपच लवकर स्थान मिळवले. विराटने ८६ कसोटी सामन्यात खेळताना ५३.६२च्या सरासरीने ७२४० धावा केल्या आहेत. यात त्याने तब्बल २७ शतके केली आहेत. या २७ पैकी तब्बल ७ शतके ही विराटने द्विशतके केली आहे. सध्या तो या यादीत वैली हैमंड, माहेला जयवर्धनेसह संयुक्तपणे चौथ्या स्थानी आहे.
४. वैली हैमंड
इंग्लंडसाठी क्रिकेट खेळताना वैली हैमंडने ८५ कसोटी सामन्यात ७ वेळा द्विशतके मारली आहेत. ३३६ धावांवर नाबाद हा हैमंडचा सर्वोत्तम धावा आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत २२ शतके आणि २४ अर्धशतके केली आहेत.
३. ब्रायन लारा
वेस्ट इंडिजसाठी १६ वर्ष क्रिकेट खेळणार्या ब्रायन लारा या महान खेळाडूच्या नावावर अशक्य असा वाटणारा कसोटी डावात ४०० धावा करण्याचा विश्वविक्रम आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ९ वेळा द्विशतके ठोकली आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये लाराच्या नावावर ११,९५३ धावा जमा आहेत तर त्याने ३४ शतके तर ४८ अर्धशतके आपल्या नावावर नोंदविली आहेत.
२. कुमार संगाकारा
श्रीलंकेचा सर्वोत्तम खेळाडू अशी ओळख निर्माण केलेला फलंदाज म्हणजे कुमार सांगाकारा. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात या खेळडूने आपले नाव चमकावले. संगाने कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल ११ वेळा द्विशतके ठोकली आहेत. कसोटीमधील आपल्या १५ वर्षाच्या दीर्घ कारकिर्दीत १२,४०० धावा, ३८ शतके आणि ५२ अर्धशतके आपल्या नावावर केली आहेत. संगाकाराचा कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम धावा ३१९धावा आहे.
सर डॉन ब्रॅडमन
जागतिक क्रिकेटमध्ये सगळ्यात यशस्वी आणि सर्वोत्तम फलंदाज म्हणजे सर डॉन ब्रॅडमन. ऑस्ट्रेलियाच्या या महान खेळाडूने ५२ टेस्ट सामन्यात ६९९६ धावा बनवल्या आहेत. त्यांच्या नावावर कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च सरासरी ९९.९४ चा विश्वविक्रम आहे .त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये १२वेळा द्विशतके झळकावली आहेत. याशिवाय त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत २९ शतके आणि १३ अर्धशतके ठोकली आहेत.
रोहित शर्माबद्दलचे वाचनिय लेख-
– खेळाडू म्हणून ५ पैकी ५ आयपीएल फायनल जिंकणारा रोहित जगातील एकमेव खेळाडू
– त्यांचा स्वत:चा मुलगा भारताकडून खेळू शकला नाही परंतु रोहितला मात्र…
– रोहित होता मधल्या फळीतील फलंदाज, या सामन्यात मिळाली सलामीला संधी
– म्हणून एक महान सलामीवीर म्हणून रोहितच नाव सचिन-सेहवागबरोबर घ्यावचं लागेल
– रोहित शर्मा विषयक १० अशा गोष्टी ज्या फारशा चर्चिल्या गेल्या नाहीत
–रोहित शर्माचे हे ५ विक्रम कोणत्याही खेळाडूला मोडणे केवळ अशक्य