सध्या खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये केवळ विराट कोहली, एमएस धोनी व ख्रिस गेलनेच वनडेत १० हजार धावांचा टप्पा पार केला आहे. परंतु असे असले तरी वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या टाॅप १० खेळाडूंमध्ये धोनी व गेल हे खेळाडू नाहीत.
सध्या विराट कोहलीच्या नावावर २४८ सामन्यात २३९ डावात ५९.३३च्या सरासरीने ११८६७ धावा आहेत. यात त्याने ४३ शतके व ५८ अर्धशतके केली आहेत.
वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट ६वा आहे. विराटने वनडेत २३६८ धावा केल्या तरी तो या यादीत दुसऱ्या स्थानी येईल.
वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये भारतीय खेळाडूंचाच बोलबाला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर सचिन तेंडुलकर आहे. तेंडुलकरने ४६३ सामन्यात १८४२६ धावा केल्या आहेत.
त्याचबरोबर या यादीत पहिल्या दहामध्ये सौरव गांगुली आणि राहुल द्रविड या भारतीय फलंदाजाचांही समावेश आहे.
भारताच्या या ४ फलंदाजांबरोबरच श्रीलंकेच्या तीन आणि ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिकेच्या प्रत्येकी एका खेळाडूचा या यादीत पहिल्या १० खेळाडूंमध्ये समावेश आहे.
वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे पहिले दहा फलंदाज-
1) सचिन तेंडुलकर (भारत) – 18426 धावा (463 सामने)
2) कुमार संघकारा (श्रीलंका)– 14234 धावा (404 सामने)
3) रिकी पॉटींग (ऑस्ट्रेलिया)– 13704 धावा (375 सामने)
4) सनथ जयसुर्या (श्रीलंका)– 13430 धावा (445 सामने)
5) माहेला जयवर्धने (श्रीलंका)– 12650 धावा (448 सामने)
6) विराट कोहली (भारत)– 11867 धावा (248 सामने)*
7) इंजमाम-उल-हक (पाकिस्तान)– 11739 धावा (378 सामने)
8) जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) – 11579 धावा (328 सामने)
9) सौरव गांगुली (भारत)– 11363 धावा (311 सामने)
10) राहुल द्रविड (भारत)– 10889 धावा (344 सामने)
ट्रेंडिंग लेख –
अशी आहे सनरायझर्स हैद्राबादची दमदार ड्रीम ११, हा खेळाडू आहे कर्णधार
आयपीएल इतिहासात प्रत्येक हंगामात सर्वात महागडा ठरलेला भारतीय खेळाडू
खराब खेळपट्टीमुळे रद्द केलेले ३ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने, २ आहेत भारतातील