‘इंडिया का त्योहार’ म्हणत आयपीएलचा १५ सिझन सुरू आहे. पहिल्याच काही दिवसात थरारक मॅचेस पाहायला मिळाल्या. इंटरनॅशनल स्टार्स लौकिकाला साजेसे खेळले, तर नव्या टॅलेंटने मने जिंकली. आता खरंतर आयपीएल आणि आयपीएल संबंधित प्रत्येक गोष्ट तुम्हाला सर्वांनाच माहितीये. आयपीएलचा इतिहास चालताबोलता कोणीही सांगेल, पण तरीही असेल काही प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरे कदाचित तुम्हाला माहित नसतील. अशाच या आयपीएल संबंधित काही अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे आपण शोधणार आहोत.
दुखापत झाल्यावर प्लेअरला किती रक्कम मिळते?
आयपीएल आणि दुखापती हे एक खास नात आहे. आयपीएल सुरू व्हायची म्हटली की, दर सिझनला दोन-तीन बडे प्लेयर दुखापतीने सिझनमधून बाहेर पडतात. टूर्नामेंट सुरू होते आणि आणखी तीन-चार जण अर्ध्यावर डाव सोडून निघून जातात, अशावेळी प्रश्न पडतो की, त्या खेळाडूंना पैसे किती मिळतात?
तर आयपीएलच्या नियमानुसार खेळाडूला सीझन सुरू व्हायच्या आधी दुखापत झाली आणि तो एकही मॅच खेळू शकला नाही, तर त्या खेळाडूला फ्रॅंचाईजीने निम्मी रक्कम देणे बंधनकारक राहते. आपण उदाहरण घेऊया, मार्क वुडला दुखापत झाली अन् तो आयपीएलमधून बाहेर गेला. लखनऊ सुपरजायंट्सने त्याला ७ कोटी ५० लाखांना खरेदी केलेले. वूड भारतात आला नसला तरीही, लखनऊला त्याला ३ कोटी ७५ लाख द्यावेच लागणार.
आयपीएलच्या अंपायर्सचा पगार किती?
आयपीएलमध्ये खेळाडू सहभागी होताना त्यांचा लिलाव होतो. काहींना कोटींमध्ये तर काहींना लाखांमध्ये बोली लागते. खेळाडू इतक्या पैशांमध्ये खेळतात. मग मैदानावरील सर्वात जबाबदार व्यक्ती असलेल्या अंपायर्सला किती पगार मिळत असेल? हा प्रश्न अनेकांच्या मनात नक्कीच डोकावला असेल. तर त्याचे उत्तर अत्यंत साधे आहे. खेळाडूंप्रमाणे अंपायरही या जवळपास दोन महिन्याच्या टूर्नामेंटमध्ये चांगली कमाई करतात. इंटरनॅशनल लेवलचे आणि विदेशी अंपायर असल्यास त्यांना ५ लाखांच्या आसपास एका सामन्यासाठी मानधन मिळते. तर डोमेस्टिक क्रिकेटमधील अंपायर्सना अडीच लाख ते तीन लाख रुपये एका सामन्याचे मिळतात. आयपीएलमध्ये कॉन्ट्रॅक्ट केलेल्या एका अंपायरला कमीत कमी १०-१२ मॅचमध्ये अंपायरींगची संधी मिळते. याचा एकूण विचार केला, तर कोणताही अंपायर ३० लाख ते ५० लाख रुपयांपर्यंत सहज कमावतो.
इमर्जिंग प्लेयर ठरवण्याचा नियम काय?
प्रत्येक वर्षी आयपीएलच्या या धामधुमीत अनेक युवा खेळाडू छाप सोडतात. या आयपीएलपासूनच त्यांचा इंटरनॅशनल क्रिकेटचा प्रवास सुरू होतो. या युवा खेळाडूंसाठी आयपीएलमध्ये दरवर्षी ‘एमर्जिंग प्लेयर ऑफ द ईयर’. हा पुरस्कार दिला जातो. मात्र, हा पुरस्कार त्याच खेळाडूंना दिला जातो. जे आयपीएलने आखून दिलेल्या नियमात बसतात. ते नियम काय आहेत ते देखील आपल्याला जाणून घ्यायला हवे. आयपीएल २०२२ साठी इमर्जिंग प्लेअरसाठीचा पहिला नियम आहे की, खेळाडूचा जन्म १ एप्रिल १९९५ आधी झाला नसावा. तसेच त्याने आपल्या देशासाठी पाच कसोटी आणि प्रत्येकी २० वनडे आणि टी२० पेक्षा जास्त सामने खेळल्या नसाव्या. आयपीएल सीझन सुरू व्हायच्या आधी त्याने २५ पेक्षा जास्त आयपीएल सामनेही खेळले नसावेत आणि महत्त्वाचं म्हणजे याआधी त्याने तो पुरस्कारही जिंकलेला नसावा.
फेअर प्ले अवॉर्ड देण्याच कोण ठरवतो?
आयपीएलमध्ये दरवर्षी स्पोर्ट्समन स्पीरीट दाखवणाऱ्या संघांना फेअर प्ले अवॉर्ड दिला जातो. ग्राउंडवर जिंकण्यासाठी एवढा जिवावरचा खेळ सुरू असताना. अनेक कॅप्टन आणि संघ खिलाडूवृत्ती सोडत नाहीत. पूर्ण टूर्नामेंटमध्ये सातत्याने अशी खिलाडूवृत्ती दाखवणारा संघ याचा हकदार बनतो. पण हा अवॉर्ड कोणाला द्यायचा हे कोण ठरवते? तर हा निर्णय सर्वस्वी अंपायर्सचा असतो. प्रत्येक सामन्यानंतर दोन्ही मैदानावरील अंपायर आणि थर्ड अंपायर दहापैकी पॉईंट्स प्रत्येक संघाला देत असतात. यातील चार पॉईंट खेळ भावनेला आणि प्रत्येकी दोन-दोन गुण अंपायर्ससोबतचा व्यवहार, क्रिकेटच्या नियमांचा आदर आणि विरोधी संघाला दिलेली वागणूक यांना असतात. यातून शेवटी ज्या संघाकडे सर्वाधिक पॉइंट्स असतील तो संघ त्या सीझनचा फेअर प्ले अवॉर्ड जिंकतो.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
वाचा –
एकीकडे हसू, दुसरीकडे आसू! वानखेडेवर झालेला झाला चेन्नई-गुजरातसाठी विक्रमी, पण…