सध्या वेस्ट इंडीजमध्ये १९ वर्षाखालील विश्वचषक खेळला जात आहे. विश्वचषकात सहभागी झालेल्या भारतच्या १९ वर्षाखालील संघाच्या आडचणी वाढल्या आहेत. भारतीय संघाने बुधवारी(१९ जानेवारी) आयर्लंडविरुद्ध त्यांचा दुसरा सामना खेळला. या सामन्यात भारतीय कर्णधार यश धूल (Yash Dhull) आणि उपकर्णधार एसके रशीद सहभागी झाले नाहीत. या दोघांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ते विलगीकरणात आहेत. विश्वचषक स्पर्धेदरम्यान खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे भारतीय संघाला मोठा झटका लागला आहे. यश धूलच्या अनुपस्थितीत निशांत सिंधूने या सामन्यात भारताचे नेतृत्व केले.
क्रिकबजने दिलेल्या माहितीनुसार संघातील जवळपास सहा खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. याच कारणास्तव मैदानावरील खेळाडूंना पाणी पाजण्यासाठी स्वतः प्रशिक्षकांनी जबाबदारी घेतली. यश धूल आणि रशीद खान यांच्याव्यतिरिक्त मानव पारख, सिद्धार्थ यादव, आराध्य यादव आणि वासु वत्स यांना देखील विलगीकरणात ठेवले गेले आहे. त्यामुळे भारतीय संघाची परिस्थिती अधिक कठीण झाली आहे.
सामन्यात खेळवण्यासाठी प्लेइंग इलेव्हनला देखील खेळाडून असेबसे गोळा केले गेले. आयसीसीने विश्वचषकात १७ खेळाडूंना सहभागी करण्यासाठी परवानगी दिली होती, त्यामुळे प्लेइंग इलेव्हन पूर्ण होऊ शकली.
एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार संघातील इतर खेळाडू कोरोनाची लागण झालेल्या खेळाडूच्या संपर्कात आले होते. याच कारणास्तवर खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना विलगीकरणात ठेवले गेले आहे. आयर्लंडसारख्या कमजोर संघाविरुद्धच्या सामन्यात संघ व्यवस्थापनाने मदत केली. पुढच्या मोठ्या सामन्याआधी संघ कोणतीच जोखीम घेऊ इच्छित नाही.
दरम्यान, १९ वर्षाखालील विश्वचषकातील भारतीय संघाचा हा दुसरा सामना होता. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण अफ्रिकेला मात दिली होती. या दुसऱ्या सामन्यात आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना पाच विकेट्सच्या नुकसानावर ३०७ धावा केल्या आहेत. हरनूर सिंग (८८) आणि अंगक्रिश रघुवंशी (७९) यांनी अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर आयर्लंडला १३३ धावांवर रोखत हा सामना १७४ धावांनी आपल्या नावावर केला.
महत्वाच्या बातम्या –
कॅप्टन्सी सोडली, पण आक्रमकता नाही! बावुमाच्या उत्तराला कोहलीचं प्रत्युत्तर अन् भर सामन्यात पेटला वाद
प्रो कबड्डी: अखेर ‘तेलुगू टायटन्स’ने उघडले विजयाचे खाते, ‘जयपूर पिंक पँथर्स’वर एका गुणाने केली मात
व्हिडिओ पाहा –