आयर्लंड आणि भारत यांच्यातील टी-20 मालिका शुक्रवारी (19 जुलै) सुरू झाली. मालिकेतील पहिला सामना भारताने 2 धावांनी दिला. पावसाच्या व्यत्ययामुळे पंचांनी भारतीय संघाला डकवर्थ लुईस नियमानुसार 2 धावांनी घोषित केले. मालिकेची सुरुवात भारतासाठी चांगली झाली. मात्र युवा फलंदाज तिलकवर्मा याची चांगलीच निराशा झाली.
तिलक वर्मा (Tilak Verma) वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारतासाठी पहिला टी-20 सामना खेळला. शुक्रवारी (18 ऑगस्ट) कारकिर्दीतील सहावा टी-20 सामना खेळण्यासाठी तिलक वर्मा मैदानात आला. पण गोल्डन डकवर (एकही धाव न करता पहिल्या चेंडूवर विकेट गमवणे) विकेट गमावली. भारतीय संघासाठी टी-20 क्रिकेटमध्ये गोल्डन डकवर बाद होणारा तिकल 28वा खेळाडू ठरला आहे. सर्वाधिक वेळा ही नकोशी कामगिरी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नावावर आहे. रोहितने भारतासाठी सर्वाधिक 4 वेळा टी-20आंतरराष्ट्रीय सामन्यात गोल्डन डकवर विकेट गमावली आहे. यादीत दुसऱ्या क्रमांकावर संयुक्तरित्या श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि वॉशिंगटन सुंदर (Washington Sundar) आहेत. या दोघांनी प्रत्येकी तीन-तीन वेळा गोल्डन डकवर विकेट गमावली आहे.
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा गोल्डन डकवर बाद होणारे भारतीय खेळाडू
– रोहित शर्मा – 4 वेळा
-श्रेयस अय्यर आणि वॉशिंगटन सुंदर – प्रत्येकी तीन-तीन वेळा
– दिनेश कार्तिक, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, रिषभ पंत – प्रत्येकी 2-2 वेळा
– तिलक वर्मा, शिखर धवन, हरभजन सिंह, सुरेश रैना, अंबाती रायडू, ईशांत शर्मा, पृथ्वी शॉ, श्रीसंत, शार्दुल ठाकुर, दीपक हुड्डा, रविंद्र जडेजा, अजिंक्य रहाणे, आशीष नेहरा, अक्षर पटेल, हर्षल पटेल, मुनाफ पटेल, मनीष पांडे, मुरली विजय, पीयूष चावला, युवराज सिंह.
दरम्यान, आयर्लंड आणि भारत यांच्यातील ही टी-20 मालिका तीन सामन्यांची आहे. मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकल्यामुळे संघ सध्या 0-1 अशा आगाडीवर आहे. मालिकेतील दुसरा सामना रविवारी (20 ऑगस्ट) आणि तिसरा सामना बुधवारी (23 ऑगस्ट) खेळला जाणार आहे. (Unwanted record on Tilak Verma’s name)
महत्वाच्या बातम्या –
रिंकूबाबत KBCमध्ये विचारला गेला 6.40 लाख रुपयांचा प्रश्न, गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांना माहितीये उत्तर
राष्ट्रीय बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत छत्तीसगढच्या धनंजय एसकडून अव्वल मानांकित खेळाडूला पराभवाचा धक्का