रविवारी (दि. 13 नोव्हेंबर) इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघातील अंतिम सामन्याने टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेची सांगता होणार आहे. या सामन्यापूर्वी खेळण्यात आलेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाला इंग्लंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. यासह भारताचा या स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला. असे असले, तरीही भारतीय संघ या स्पर्धेतून रिकाम्या हाती भारतात परतणार नाही. खरं तर, भारतीय संघाने उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास केला, त्यामुळे त्यांना मोठी बक्षीस रक्कम मिळणार आहे.
भारतीय संघाची या स्पर्धेतील कामगिरी
भारतीय संघाने या स्पर्धेत सुपर 12 फेरीत एकूण 5 सामने खेळले होते. यातील पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध झाला होता. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर शानदार विजय मिळवला होता. यानंतर फक्त दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताच्या पदरात अपयश आले. उर्वरित नेदरलँड्स, बांगलादेश आणि झिम्बाब्वे संघाविरुद्ध भारताने शानदार विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली होती. मात्र, उपांत्य सामन्यात इंग्लंडने भारताला 10 विकेट्सने पराभूत करत स्पर्धेबाहेर काढले. मात्र, भारतीय संघ आपल्या देशात परतताना मोठी बक्षीस रक्कम घेऊन जाणार आहे.
भारताला उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास केल्यामुळे तब्बल 3.26 कोटी रुपये बक्षीस मिळणार आहे. भारताप्रमाणेच न्यूझीलंड संघालाही उपांत्य फेरीत पोहोचल्यामुळे 3.26 कोटी रुपयेच मिळणार आहेत.
विजेत्या संघाला मोठे बक्षीस
आता अंतिम सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर पाकिस्तान आणि इंग्लंड आमने-सामने असणार आहेत. या अंतिम सामन्यात जो संघ विजय मिळवेल, त्या संघाला 1.6 मिलियन डॉलर म्हणजेच 13 कोटी रुपये बक्षीस मिळेल. दुसरीकडे, पराभूत होणाऱ्या संघाला 0.8 मिलियन डॉलर म्हणजेच 6.5 कोटी रुपये मिळतील.
टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेची एकूण रक्कम 5.6 मिलियन डॉलर म्हणजेच 45 कोटी रुपये आहे. ही रक्कम विजेत्या, उपविजेत्या, उपांत्य फेरी, सुपर 12 फेरी आणि पहिल्या फेरीच्या आधारावर वाटली केली जाईल. (usd 400000 is the reward that the team india would get for their semi finals match)
टी-20 विश्वचषक 2022ची एकूण रक्कम- 45 कोटी
विजेता संघ- 1.6 मिलियन डॉलर (जवळपास 13 कोटी रुपये)
उपविजेता संघ- 0.8 मिलियन डॉलर (जवळपास 6.5 कोटी रुपये)
उपांत्य सामन्यात पराभूत होणारे संघ- 0.4 मिलियन डॉलर (जवळपास 3.26 कोटी रुपये)
सुपर 12 फेरीत प्रत्येक सामना जिंकणारा संघ- 40 हजार डॉलर (जवळपास 33.62 लाख रुपये)
सुपर 12 फेरीतून बाहेर होणारा प्रत्येक संघ- 70 हजार डॉलर (जवळपास 57.09 लाख रुपये)
पहिल्या फेरीत प्रत्येक सामना जिंकणारा संघ- 40 हजार डॉलर (जवळपास 33.62 लाख रुपये)
पहिल्या फेरीतून बाहेर होणारा प्रत्येक संघ- 40 हजार डॉलर (जवळपास 33.62 लाख रुपये)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मातीशी नाळ जोडलेला व्यक्ती’, डिविलियर्सला मुंबईच्या रस्त्यावर चहा पिताना पाहून चाहत्याची लक्षवेधी कमेंट
असा राहिलाय इंग्लंड-पाकिस्तानचा ‘रोड टू फायनल’; अंतिम फेरीत कोण मारणार बाजी?