बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबादमध्ये खेळला जात आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी भारतीय संघाला हा सामना जिंकणे गरजेचे आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) याने जबरदस्त प्रदर्शन करत शतक पूर्ण केले. त्याने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 180 धावांची ऐतिहासिक खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली.
सलामीवीर उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) याने दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी नाबाद 104 धावा केल्या होत्या. त्याने आपली तीच लय दुसऱ्या दिवशी देखील कायम राखली. त्याने कॅमेरून ग्रीन याच्यासह पहिल्या सत्रात भारताला एकही यश मिळू दिले नाही. त्यानंतर दुसरे सत्र देखील त्याने खेळून काढले. दिवसातील अखेरच्या सत्रातील पहिल्याच चेंडूवर तो बाद झाला. त्याने संपूर्ण पाच सत्र फलंदाजी करताना 422 चेंडूंचा सामना करताना 180 धावा केल्या. यात 21 चौकारांचा समावेश होता.
तब्बल दहा तासांच्या मॅरेथॉन खेळीत त्याने ऑस्ट्रेलियन फलंदाजाकडून भारतात कसोटीच्या एका डावात सर्वाधिक चेंडू खेळण्याचा विक्रम आपल्या नावे केला. भारतात भारताविरुद्ध एका कसोटी डावात 400 चेंडू खेळणारा तो पहिला ऑस्ट्रेलियन फलंदाज बनला. यापूर्वी भारतात कसोटीच्या एका डावात सर्वाधिक चेंडू खेळण्याचा विक्रम ग्रॅहम यालप यांच्या नावे होता. त्यांनी 1979 मध्ये कोलकाता कसोटीत 392 चेंडूंचा सामना केला होता. या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी स्टीव्ह स्मिथ हा आहे. त्याने 2017 मध्ये रांची कसोटीत तब्बल 361 चेंडूंचा सामना केला होता.
ऑस्ट्रेलियन संघाने आपल्या पहिल्या डावात सर्वबाद 480 धावा केल्या. ख्वाजाच्या 180 धावांच्या योगदानाव्यतिरिक्त युवा कॅमेरून ग्रीन याने देखील शतकी खेळी केली. नवव्या गड्यासाठी लायन व मर्फी यांनी 70 धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाचा डाव पुढे नेला. भारतीय संघासाठी रविचंद्रन अश्विन याने सर्वाधिक सहा बळी टिपले.
(Usman Khawaja Marathon Century Creat Record For Australia One Batter Who Faced Most Balls In An Inning)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
संतापजनक! धावांचा डोंगर उभा राहताच कर्णधार रोहित हादरला, पाणी घेऊन आलेल्या सहकाऱ्यावर मोक्कार चिडला
टीम इंडियाच्या गोलंदाजीची पिसे काढत ऑस्ट्रेलियाच्या कॅमरुन ग्रीनने बनवला मोठा रेकॉर्ड, स्वप्नही झाले पूर्ण