पुणे। बाऊन्स टेनिस अकादमी व सनी वर्ल्ड आणि कासट सारीज रविवार पेठ पुरस्कृत यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या बाऊन्स टेनिस अकादमी -एमएसएलटीए एआयटीए 14वर्षांखालील सुपर सिरिज 2022 स्पर्धेत मुलींच्या गटात साईइती वराडकर, श्रेया पठारे या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत आगेकूच केली.
सनी वर्ल्ड टेनिस कोर्ट, पाषाण सुस रोड येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात दुसऱ्या फेरीत संघर्षपूर्ण लढतीत महाराष्ट्राच्या बिगरमानांकीत साईइती वराडकर हिने आठव्या मानांकित गुजरातच्या पिया मिस्त्रीचा 6-4, 3-6, 7-5 असा तीन सेटमध्ये पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या महाराष्ट्राच्या श्रेया पठारेने सातव्या मानांकित आपलीच राज्य सहकारी रिवा मेहताचे आव्हान 6-0, 6-2 असे मोडीत काढले. पुण्याच्या मृणाल शेळकेने सृष्टी सूर्यवंशीचा 6-1, 6-2 असा तर, पाचव्या मानांकित सिया प्रसादेने ह्रितिका कापलेचा 6-0, 6-3 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
मुलांच्या गटात नांदेडच्या अव्वल मानांकित शिवतेज शिरफ़ुले याने अयान शेट्टीचे आव्हान 6-2, 6-2 असे संपुष्टात आणले. पाचव्या मानांकित अवनीश चाफळे याने माहिजीत प्रधानवर 6-0, 7-5 असा विजय मिळवला.
निकाल: मुख्य ड्रॉ(दुसरी फेरी): मुली:
देवांशी प्रभुदेसाई(महा)[1] वि.वि.व्रण्डिका राजपूत(महा)6-2, 6-4;
साईइती वराडकर(महा)वि.वि.पिया मिस्त्री(गुजरात)[8]6-4, 3-6, 7-5;
मृणाल शेळके(महा)वि.वि.सृष्टी सूर्यवंशी(महा)6-1, 6-2;
श्रेया पठारे(महा)वि.वि.रिवा मेहता(महा)[7] 6-0, 6-2;
सिया प्रसादे(महा)[5]वि.वि.ह्रितिका कापले(महा) 6-0, 6-3;
मेहक कपूर(महा)[3]वि.वि.देवाश्री महाडेश्वर(महा)6-2, 6-1;
रिद्धी शिंदे(महा)[6] वि.वि.स्वनिका रॉय(महा)2-6, 6-3, 6-3;
जीडी मेघना(कर्नाटक)[2] वि.वि.सेरेना रॉड्रिक्स(महा)6-0, 6-3;
मुले:
शिवतेज शिरफ़ुले(महा)[1] वि.वि.अयान शेट्टी(महा)6-2, 6-2;
अवनीश चाफळे(महा)[5] वि.वि.माहिजीत प्रधान(महा)6-0, 7-5;
विश्वजीत सणस(महा)[3] वि.वि.अर्जुन वेल्लूरी(महा)6-1, 6-3;
तेज ओक(महा)वि.वि.एम श्रेयंथ(कर्नाटक)6-3, 6-4;
नील केळकर(महा)वि.वि.सूर्या काकडे(महा)6-4, 6-4;
सक्षम भन्साळी(महा)वि.वि. सार्थक गायकवाड(महा) 6-1, 6-3;
दक्ष पाटील(महा)वि.वि.चन्नामल यले(कर्नाटक)6-4, 6-4;
आरुष भल्ला(महा)वि.वि.वरद पोळ(महा) 6-4, 6-3.
महत्त्वाच्या बातम्या –
एसपी गोसावी मेमोरियल पुणे आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र मंडळ संघाची आगेकूच