---Advertisement---

धोनीमुळे घडला ‘सलामीवीर’ रोहित, आता रोहितमुळे घडणार ‘हा’ फलंदाज; विंडीजविरुद्ध मिळणार नवी जबाबदारी

On: गुरूवार, फेब्रुवारी 3, 2022 11:59 PM
Venktesh Iyer, Team India
---Advertisement---

भारत आणि वेस्ट इंडीज (ind vs wi odi series) यांच्यातील एकदिवसीय मालिका ६ फेब्रुवारीपासून खेळली जाणार आहे. त्यापूर्वी भारतीय संघातील चार खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली आहे. सुरुवातीला सलामीवीर शिखर धवन आणि नवदीप सैनी यांचे कोरोना अहवाल पॉजिटिव्ह आले होते. त्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि श्रेयस अय्यर यांच्यासह सपोर्ट स्टाफमधील काही सदस्यांचे अहवाल पॉजिटिव्ह आले. अशात युवा अष्टपैलू वेंकटेश अय्यर (venkatesh iyer) साठी चांगली संधी तयार होताना दिसत आहे.

धवन आणि ऋतुराज गायकवाडला कोरोनाची बाधा झाल्यानंतर भारताच्या डावाची सुरुवात करण्यासाठी संघात पर्यायी खेळाडू उरलेला नाहीय. उपकर्णधार केएल राहुलही पहिल्या एकदिवसीय सामन्यात विश्रांतीवर आहे. अशात वेंकटेश अय्यर भारताच्या डावाची सुरुवात करू शकतो. असे असले तरी, बीसीसीआयने खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर मयंक अगरवालला संघात सामील केले. त्यामुळे रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करण्यासाठी मयंकही प्रबळ दावेदार आहे.

आयपीएलमध्ये पार पाडली आहे चांगल्या सलामीवीराची भूमिका
वेंकटेश अय्यरने आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघासाठी सलामीवीराची भूमिका पार पाडली आहे. आयपीएलमध्ये मागच्या हंगामात डावाची सुरुवात करताना वेंकटेशने केलेली खेळी कौतुकास पात्र होती. त्याने जगातील सर्वोत्तम गोलंदाजांची धुलाई केली. अशात वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत अय्यर भारताच्या डावाची सुरुवात करण्यासाठी भक्कम दावेदार आहे. जर त्याला ही संधी मिळाली आणि त्याने अपेक्षित कामगिरी केली, तर पुढच्या मोठ्या काळासाठी भारतीय संघाला एक चांगला सलामीवीर फलंदाज मिळू शकतो. कारण केएल राहुल चौथ्या क्रमांकावरही फलंदाजी करू शकतो.

रोहित शर्मासोबतही घडले होते असेच काही
दरम्यान, रोहित शर्मासोबतही असेच काही घडले होते, जेव्हा २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताकडे सलामीवीर फलंदाज नव्हता. त्यावेळी एमएस धोनीने रोहितवर विश्वास दाखवून त्याला डावाची सुरुवात करण्यासाठी पाठवले होते. त्या सामन्यानंतर रोहितचे संपूर्ण कारकीर्दच बदलली. पहिल्या सामन्यात रोहितने उत्कृष्ट खेळी करत अर्धशतक ठोकले. त्याने पुढच्या सामन्यांमध्ये रोहितने सलामीवीराच्या भूमिकेत तीन अर्धशतके केली. आता सध्या रोहित जगातील सर्वोत्तम सलामीवीरांमध्ये गणला जातो. स्वतःसोबतचा अनुभव लक्षात घेऊन रोहित वेंकटेशलाही अशीच संधी देऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या –

धोनीचा अघोरी अवतार ठरतोय लक्षवेधी, ‘अथर्व: द ओरिजिन’चा अंगावर शहारे आणणारा टीझर पाहिलाय का?

तमिळ थलाईव्हाजचा तेलुगू टायटन्सवर एकतर्फी विजय, ४३-२५ च्या फरकाने मारली बाजी

मयंक अगरवाल नसेल पंजाब किंग्जचा नवा संघनायक? फ्रँचायझीचं जरा वेगळंच आहे मत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---