आयपीएल 2023 मध्ये सनरायझर्स हैदराबादची कामगिरी अत्यंत निरस झाली. या संघाने हंगामात आतापर्यंत 13 सामने खेळले असून, ज्यामध्ये त्यांनी चार सामने जिंकले आहेत. तर 9 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसरीकडे, या संघाचा गोलंदाज उमरान मलिक गेल्या काही सामन्यांपासून संघाबाहेर दिसत आहे. संघाच्या या रणनीतीवर अनेक दिग्गज खेळाडूंनी प्रश्न उपस्थित केले. आता याच प्रकरणी भारतीय संघाचा माजी खेळाडू झहीर खान याने ही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
एका क्रिकेट संकेतस्थळाशी बोलताना तो म्हणाला, “पडद्यामागे त्याच्यासोबत काय चालले आहे ते समजत नाही. मात्र, मला असे वाटते की उमरान मलिकला सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझीने चांगले हाताळले नाही. त्याचा ज्याप्रकारे वापर व्हायला हवा होता, तसा वापर झालेला नाही. युवा गोलंदाजांना पाठिंबा आणि चांगले वातावरण हवे असते. पण दुःखाची गोष्ट अशी आहे की सनरायझर्सने त्याची योग्य काळजी घेतली नाही. त्यामुळे हा हंगाम उमरानने विसरण्याची गरज आहे.”
उमरान मलिकची या हंगामातील कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे. त्याला साथ सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. यामध्ये तो केवळ पाच बळी मिळवू शकला. यादरम्यान त्याची सरासरी 35 पेक्षा जास्त तर इकॉनॉमी रेट 10 पेक्षा अधिक राहिला.
उमरानने मागील वर्षी संघासाठी सर्वाधिक 22 बळी टिपले होते. त्यानंतर त्याला भारतीय संघात देखील संधी मिळाली. या हंगामात त्याच्याकडून सर्वांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, तो या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरला. काही दिवसांपूर्वी उमरान हा पुढील हंगामात दुसऱ्या संघासाठी खेळू इच्छित असल्याचे देखील वृत्त आले होते.
(Veteran Zaheer Khan Slams Sunrisers Hyderabad Team Management For Not Picking Umran Malik)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटचे कौतुक कराच पण प्लेसिसचे योगदान विसरु नका! नेतृत्वासह फलंदाजीची वाहतोय धुरा
लखनऊने विराटच्या शतकानंतर ट्वीट करत माजवली खळबळ; नेटकरी म्हणाले, ‘आता युद्धासाठी तयार व्हा, गंभीर…’