आयपीएल फ्रँचायझी राजस्थान रॉयल्स २०२२ हंगामात जबरदस्त प्रदर्शन केले. तब्बल १४ वर्षांनंतर राजस्थान संघ आयपीएलच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहचू शकला, पण अंतिम सामन्यात मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. असे असले तरी, त्यांचे हंगामातील प्रदर्शन मात्र अविस्मरणीय राहिले. आता राजस्थान फ्रँचायझीने दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीपला एका खास भेटवस्तू दिली आहे.
राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि त्यांचा सलामीवीर फलंदाज जोस बटलर (Jos Buttler) यांनी आयपीएल २०२२ हंगाम गाजवला, यात कसलीच शंका नाही. बटलर या हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आणि यासाठी त्याला ऑरेंज कॅपने सन्मानित केले गेले. आता फ्रँचायझीने हंगामात बटलरची स्वाक्षरी असेलली बॅट किच्चा सुदीप (Kichha Sudeep) याला भेट म्हणून पाठवली आहे.
सुदीपने ही भेट त्याच्यापर्यंत पोहोचली असल्याचे सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमांतून सांगितले आहे. अधिकृत ट्विटर खात्यावरून किच्चा सुदीपने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओत त्याच्या हातात जोस बटलरची बॅट दिसत आहे, ज्यावर त्याने स्वतःची स्वाक्षरी देखील केलेली आहे. राजस्थान रॉयल्सकडून मिळालेल्या या भेटवस्तूसाठी सुदीपने फ्रँचायझीचे आभार मानले.
A big hug to this sweet surprise and a sweetest gesture.
Thank you @josbuttler@rajasthanroyals @cariappa14
🥂🥳❤️ pic.twitter.com/EyXOqyJQY0— Kichcha Sudeepa (@KicchaSudeep) June 9, 2022
दरम्यान, राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या पहिल्या हंगामात म्हणजे २००८ साली स्पर्धेची ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर संघ मागच्या १४ वर्षांमध्ये एकदाही अंतिम सामन्यात पोहोचला नव्हता. यावर्षी संघाला अंतिम सामना खेळण्याची संधी मिळाली, पण गुजरात टायटन्सने त्यांना मात दिली. बटलरने या हंगामातील १७ सामन्यांमध्ये सर्वाधिक ८६३ धावा केल्या. तो विराट कोहली आणि डेविड वॉर्नरनंतर एका हंगामात ८०० पेक्षा जास्त धावा करणारा तिसरा खेळाडू ठरला.
आयपीएल २०२२ हंगाम सुरू होण्यापूर्वी राजस्थाला शेन वॉर्नच्या निधनामुळे मोठा धक्का बसला. राजस्थानने जेव्हा पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकली, तेव्हा वॉर्न संघाचा कर्णधार होता. मागच्या हंगामापर्यंत वॉर्न राजस्थानच्या सपोर्ट स्टाफमध्ये होता, पण या हंगामात मात्र त्याची कमी संघातील खेळाडूंना जाणवली. अंतिम सामना जिंकून वॉर्नला श्रद्धांजली देण्याची राजस्थान संघाची इच्छा होती, पण ते शक्य झाले नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
INDvsSA । ‘या’ ६ खेळाडूंची कामगिरी दुसऱ्या टी२० सामन्यात ठरणार निर्णायक, टाका एक नजर
जेव्हा तुटला होता ‘कॅप्टन कूल’ धोनीच्याही संयमाचा बांध, भलताच झालेला ‘अँग्री यंग मॅन’