fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

‘मी चांगले खेळलो तरच लोक माझ्याबद्दल चांगलं बोलतील,’ पहा कोण म्हणतंय हे…

Vijay Shankar Opens up on Comparison with Hardik Pandya

नवी दिल्ली । भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकरने आपली तुलना हार्दिक पंड्याबरोबर होत असल्याबद्दल त्यावर आपले मत व्यक्त केले आहे. तो म्हणाला की, तो याबद्दल विचार करून स्वत:ला त्रास द्यायचा नाही. तर जेव्हापर्यंत पंड्या आहे, तोपर्यंत तो संघाचा अव्वल क्रमांकाचा अष्टपैलू क्रिकेटपटू बनू शकत नाही.

खरंतर पंड्या सर्वप्रकारे शंकरपेक्षा उत्कृष्ट खेळाडू आहे. मग ते गोलंदाजीत असो किंवा मग फलंदाजीत पंड्याचे नाव आजही जगातील सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटपटूंमध्ये घेतले जाते. तसेच प्रत्येक क्रिकेट प्रकारात पंड्या ही भारतीय संघाची पहिली पसंत असण्याची शक्यता असते.

शंकर (Vijay Shankar) आणि पंड्याची (Hardik Pandya) नेहमीच तुलना होत राहिली आहे. परंतु यापूर्वी शंकरने याबद्दल कोणताच खुलासा केला नव्हता. शेवटी त्याने यावर मौन सौडले आहे. तसेच त्याने एका मुलाखतीत पंड्याबरोबर केलेल्या तुलनेवर मोकळेपणाने सांगितले आहे.

तो म्हणाला की, “जर माझ्यावर या सर्वांचा परिणाम होऊ लागला, तर मला चांगली कामगिरी करता येणार नाही. माझे लक्ष केवळ आपल्या सामन्यांवर आणि कामगिरीवर असले पाहिजे. मी चांगले खेळलो तरच लोक माझ्याबद्दल चर्चा करतील. तसेच माझी भारतीय संघात निवडही होईल.”

“मी याबद्दल विचार करणार नाही की, इतर खेळाडू काय करत आहेत. मला अधिक काळापर्यंत आंतरराष्ट्रीय खेळायचे आहे आणि हे चांगले प्रदर्शन केल्यावरच हे शक्य होऊ शकते,” असेही शंकर यावेळी म्हणाला.

आपल्या सरावाबद्दल बोलताना तो म्हणाला की, लॉकडाऊनमुळे (Lockdown) त्याला सध्या सराव करता येत नाही. परंतु लवकरच सराव सुरु करण्याची तयारी करणार आहे. तो म्हणाला की, “साधारणत: मी चेंडू किंवा थ्रोडाऊन टाकण्यासाठी २ किंवा ३ लोकांना बोलावतो. परंतु लॉकडाऊन असल्यामुळे मला तसे करता येत नाही. कदाचित आता सराव सुरु होण्याची शक्यता आहे.”

ट्रेंडिंग घडामोडी-

-लॉर्ड्सनंतर ‘दादा’ दिसला आता आणखी एका बाल्कनीत; पण तो नक्की करतोय तरी काय?…

-२०१९ विश्वचषक पराभवाचे खापर गौतम गंभीरने फोडले या लोकांवर

-कसोटीत वेगवान त्रिशतक करणारे ५ क्रिकेटपटू

You might also like