वेस्ट इंडिज सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये नुकताच ३ वनडे सामन्यांची मलिका पार पडली होती. या मालिकेत भारतीय संघाने ३-० ने विजय मिळवला होता. परंतु या मालिकेत भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. त्याला या मालिकेत एकही मोठी खेळी करता आली नाही. दरम्यान टी२० मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी विराट कोहलीच्या फॉर्म बद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
वनडे मालिका झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्माला विराट कोहलीच्या फॉर्मबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावेळी रोहित शर्माने सडेतोड उत्तर देत म्हटले होते की, विराट कोहलीची फलंदाजी आणि फॉर्म आमच्यासाठी चिंतेचा विषय नाहीये.
तसेच भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी विराट कोहलीच्या फॉर्मबद्दल बोलताना म्हटले की, “मला नाही वाटत की, विराट कोहली सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. मुख्यतः वनडे आणि टी२० मध्ये. त्याला वनडे मालिकेत साजेशी कामगिरी करता आली नाही तरीदेखील नेट्समध्ये तो चांगली कामगिरी करत होता. ज्याप्रकारे तो मेहनत घेतोय, ते पाहून नक्कीच आम्हाला आनंद होतोय.”
विराटचा फॉर्म आमच्यासाठी चिंतेचा विषय नाही
वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यानंतर विराट कोहलीच्या फॉर्मबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावर रोहित शर्मा उत्तर देत म्हणाला की, “विराटला आत्मविश्वासाची गरज आहे का? काय बोलताय तुम्ही? विराटच्या फॉर्मची आम्हाला चिंता नाही. शतक न करणे ही वेगळी बाब आहे. त्याने अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या ३ सामन्यात दोन अर्धशतके झळकावली होते. त्यामुळे त्याची काही चूक आहे असे मला वाटत नाही. संघ व्यवस्थापनाला त्याच्या फॉर्मची चिंता नाही. खेळाडू आणि वैयक्तिकरित्या आम्हाला माहित आहे की आम्हाला कशावर लक्ष केंद्रित करायचे आहे.”
महत्वाच्या बातम्या :
डू प्लेसिस, कोहली, मॅक्सवेल; कोण होईल आरसीबीचा भावी कर्णधार? माइक हेसनने केला खुलासा
प्रेमासाठी काहीपण! भारताचा ‘जंबो’ गोलंदाज कुंबळेने प्रेमासाठी दिली होती न्यायालयीन लढाई
‘धोनीला १२ कोटी, तर तुला १४ कोटी, याकडे कसा पाहातो?’, प्रश्नावर दीपक चाहरने दिले ‘असे’ उत्तर