fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

लाॅकडाऊनधील पहिल्याच क्रिकेट सामन्यात ५ षटकांत ७० धावांची आतिषबाजी

Vincy Premier T10 League 2020 2nd Match La Soufriere Hikers vs Botanic Garden Rangers Live Cricket Score Fancode ISH vs BGR Live Streaming

कॅरिबियन बेटावरील विन्सी प्रीमीयर लीग टी१० ही स्पर्धा २२ मेपासून सुरु झाली आहे. या स्पर्धेतील दुसरा सामना ला सॉफ्रीयर हायकर्स आणि बोटॅनिक गार्डन्स रेंजर्स संघात खेळण्यात आला.

या सामन्यात ला सॉफ्रीयर हायकर्सच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. त्यांनी सलवान ब्राऊन आणि कर्णधार डेरसन मलोनीच्या धडाकेबाज खेळीमुळे बोटॅनिक गार्डन्स रेंजर्सला ने १० विकेट्सने पराभूत केले.

ला सॉफ्रीयर हायकर्सने (La Soufriere Hikers) सुरुवातीच्या ५.५ षटकात एकही विकेट न गमावता ७३ धावा केल्या. हायकर्सकडून फलंदाजी करताना मलोनीने २० चेंडूत ४१ धावा केल्या. यामध्ये ३ षटकारांचा समावेश आहे. तसेच ब्राऊनने १६ चेंडूत २२ धावा केल्या. यात १ षटकाराचा समावेश आहे.

तत्पूर्वी बोटॅनिक गार्डन्स रेंजर्सने (Botanic Garden Rangers) प्रथम फलंदाजी करताना १० षटकात ५ बाद ७० धावा केल्या होत्या. यामध्ये रेंजर्सकडून फलंदाजी करताना केसरीक विल्यम्सने (Kesrick Williams) सर्वाधिक १५ धावा केल्या होत्या. तर हायकर्सकडून गोलंदाजी करताना जेरेमी हेवूडने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.

विशेष म्हणजे कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) संकटानंतर ही खेळली जाणारी पहिलीच फ्रँचायझी क्रिकेट स्पर्धा आहे.

ट्रेंडिंग घडामोडी-

-भविष्यात टीम इंडियाकडून अष्टपैलू म्हणून खेळण्याची क्षमता असलेले ३ खेळाडू

-विराट कोहलीच्या ‘या’ चुकिमुळे भारत जिंकत नाही विश्वचषक

-जेलची हवा खावी लागलेले ५ क्रिकेटपटू; दोन नावं आहेत भारतीय

You might also like