---Advertisement---

विराटचा निर्णय चुकला? ‘भारताने खरे तर…’, टीम इंडिया शंभरच्या आत ऑलआऊट झाल्यावर ‘या’ दिग्गजाने केले ट्विट

root-virat
---Advertisement---

इंग्लंड आणि भारत या दोन्ही संघांमध्ये पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना हेडिंग्ले मैदानावर सुरू आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याचा निर्णय चुकीचा ठरला. त्याच्या या निर्णयावर माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

भारताचा उडाला ७८ धावांत खुर्दा
मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात भारतीय खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली होती. या मालिकेत भारतीय संघ १-० ने आघाडीवर आहे. त्यामुळे असा अंदाज व्यक्त केला गेला होता की, भारतीय संघ या सामन्यात विजय मिळवून आघाडी वाढवेल. परंतु, इंग्लंडच्या गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन करत भारतीय संघाचा डाव अवघ्या ७८ धावांवर संपुष्टात आणला.

कांबळी यांनी उपस्थित केला प्रश्न
भारतीय कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. जो पूर्णपणे भारतीय संघावर उलटला. त्यामुळे माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी यांनी विराट कोहलीच्या निर्णयावर ट्विट करत प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘नाणेफेक खूप महत्वाची होती. भारतीय संघाने गोलंदाजी करायला हवी होती.’

कांबळी यांच्या मते, नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करायला हवी होती. मात्र या ट्विटला प्रतिसाद देत, अनेकांनी असे ही म्हटले आहे की, ही खेळपट्टी फलंदाजी करण्यासाठी योग्य होती. फक्त भारतीय फलंदाजांनी चांगली फलंदाजी करायला हवी होती.

इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच विराटने जिंकली नाणेफेक  
तिसरा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमध्ये आतापर्यंत एकूण ८ कसोटी सामने खेळले होते. या सर्व सामन्यांमध्ये भारतीय संघाने नाणेफेक गमावली होती.

साल २०१८ मध्ये झालेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पाचही सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक गमावलेली. त्यानंतर न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात आणि नुकत्याच सुरू असलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या २ कसोटी सामन्यात विराटने नाणेफेक गमावली होती. त्यानंतर, आता नवव्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीला नाणेफेक जिंकण्यात यश आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘भाऊ, माझा भाला परत दे’, जेव्हा नीरजला फायनलआधी पाकिस्तानी खेळाडूकडून मागावा लागला स्वत:चा भाला

अख्ख्या टीम इंडियाला पुरून उरले इंग्लंडचे दोन पठ्ठे! इतिहासात चौथ्यांदा रचली गेली ‘अशी’ भागीदारी

जोफ्रा आर्चर क्रिकेटमध्ये नक्की कधी करणार पुनरागमन? स्वत: वेगवान गोलंदाजानेच दिले उत्तर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---