क्रिकेट विश्वात विराट कोहलीची तुलना नेहमीच सचिन तेंडुलकरशी केली जाते. चाहते आणि क्रिकेट तज्ज्ञ काहीही म्हणत असले तरी पण सचिनला टीव्हीवर पाहतच मोठा झाल्याचं विराट कोहली मानतो. अशा स्थितीत त्याची सचिनशी तुलना करणे अयोग्य ठरेल. सचिनला भारतीय संघातून निवृत्त होऊन बरीच वर्षे झाली आहेत. तर किंग कोहली अजूनही देशासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर भाग घेत आहे. ज्यामध्ये तो एकदिवसीय आणि कसोटी या दोन क्रिकेट फॉरमॅटमध्ये सक्रिय आहे. तर टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या यशाने त्याने टी-20 फॉरमॅटला अलविदा केला आहे.
टीम इंडियाला बांग्लादेशविरुद्ध लवकरच 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. किंग कोहलीने येथे फलंदाजी केल्यास तो एक विक्रम आपल्या नावावर करेल. खरं तर, सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वात जलद 27 हजार धावा करण्याचा विशेष विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने 623 डावांत (226 कसोटी डाव, 396 एकदिवसीय डाव आणि 1 टी-20) 27,000 चा आकडा गाठला.
आगामी मालिकेत विराट कोहलीने 58 धावा केल्या तर सचिनची ही खास कामगिरी तो आपल्या नावावर करेल. सध्या त्याने देशासाठी 591 डाव खेळले असून ज्यामध्ये त्याने 26942 धावा केल्या आहेत. असे नाही की कोहलीने बांग्लादेशविरुद्ध 58 धावा केल्या नाहीत तर तो एका खास कामगिरीला मुकेल. त्याच्याकडे सचिनचा खास विक्रम मोडण्याची पुरेशी संधी आहे.
आगामी मालिकेत कोहली सचिनच्या या खास कामगिरीची पुनरावृत्ती करेल अशी शक्यता आहे. असे केल्याने कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात 600 पेक्षा कमी डावात 27,000 धावा करणारा पहिला क्रिकेटर बनेल.
सध्या सचिन तेंडुलकर व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आणि श्रीलंकेचा माजी क्रिकेटर कुमार संगकारा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 27000 हून अधिक धावा केल्या आहेत.
हेही वाचा-
ट्रॅव्हिस हेडचा पंजाब किंग्जच्या कर्णधारावर हल्लाबोल, एका षटकात कुटल्या 30 धावा; पाहा व्हिडिओ
‘कप’च्या नावावर ‘बाउल’ दिले, मालिका जिंकूनही ऑस्ट्रेलियाचा अपमान? व्हिडिओ व्हायरल
कांगारुंचा वरचढ! यजमान इंग्लंडचा घरच्या मैदानावर दारुण पराभव