---Advertisement---

कसोटी मालिका गमावूनही कोहली, बुमराहची आयसीसी क्रमवारीत ‘उंच उडी’, रोहितही टॉप-१० मध्ये

Virat-Kohli-Jasprit-Bumrah
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याला आयसीसीने बुधवारी (१९ जानेवारी) जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीमध्ये (ICC Teat Ranking) फायदा झाला आहे. तसेच भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याला देखील कसोटी क्रमवारीत फायदा झाला आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने २-१ असा पराभव पत्करला. परंतु तरीही या दोन भारतीयांनी कसोटी क्रमवारीत फायदा करून घेतला आहे.

विराटने दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात महत्वपूर्ण फलंदाजी केली होती. संघाला आवश्यकता असताना त्याने सामन्याच्या पहिल्या डावात ७९ धावा ठोकल्या होत्या. याच खेळाचा फायदा विराटला कसोटी क्रमवारीत झाला आहे. विराट आता फलंदाजांच्या यादीत दोन स्थानांनी वरती सरकत सातव्या स्थानावर आला आहे. कसोटी क्रमवारीत त्याच्याकडे ७६७ गुण आहेत.

व्हिडिओ पाहा- सचिन-कांबळीच्या करामतीने गांगुलीच्या रुममध्ये झालेलं पाणीच पाणी

या यादीत पहिल्या १० फलंदाजांमध्ये भारताचे रोहित शर्मा आणि विराट हे दोन फलंदाज आहेत. रोहित दक्षिण अफ्रिका दौऱ्यात दुखापतीमुळे सहभागी नसला, तरी त्याने स्वतःचे पाचवे स्थान कायम राखले आहे.

बुमराहची तीन स्थानांनी आघाडी
गोलंदाजांच्या क्रमवारीचा विचार केला, तर जसप्रीत बुमराहने देखील चांगली प्रगती केली आहे. बुमराह आता क्रमवारीत तीन स्थानांनी वरती सरकला आहे. तीन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत त्याने १२ विकेट्स नावावर केल्या होत्या. यापूर्वी तो पहिल्या १० गोलंदाजांमध्ये सहभागी नव्हता, पण आता त्याने १० वा क्रमांक गाठला आहे. त्याच्याकडे ७६३ गुण आहेत. दक्षिण अफ्रिकेच्या कगिसो रबाडाला देखील मोठा फायदा झाला आहे. रबाडा दोन स्थानांनी आघाडी घेत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. रबाडामुळे काइल जेमिसन आणि शाहीन शाह अफ्रिदी हे दोघे एका स्थानाने खाली घसरले आहेत. ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्स पहिल्या स्थानावर कायम आहे.

ट्रेविस हेडची मोठी झेप
फलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाच्या ट्रेविस हेडने मोठी झेप घेतली आहे. हेड सात स्थानाची उडी मारत सहाव्या स्थानावर पोहचला आहे. त्याने होबार्टमध्ये खेळल्या गेलेल्या ऍशेस मालिकेतील शेवटच्या कसोटीत उत्कृष्ट शतक ठोकले होते. तर ऑस्ट्रेलियाच्या स्टीव स्मिथ एका स्थानाने खाली घसरून चौथ्या क्रिमांकावर आला आहे. न्यूझीलंडच्या केन विलियम्सनने तिसरे स्थान काबीज केले आहे.

महत्वाच्या बातम्या –

कॅरिबियन खेळाडूंची बातच काही और! फलंदाजाला बाद केल्यानंतरचे ‘बुलेट’ सेलिब्रेशन व्हायरल

वेंकटेशचे पदार्पण ते अश्विन-युझीचं एकत्र खेळणं, पर्ल वनडे अनेक कारणांनी भारतासाठी राहिली खास

पहिल्या वनडेसाठी असे आहेत भारत-दक्षिण आफ्रिकेचे ११ जणांचे संघ; वेंकटेश अय्यरचे झाले पदार्पण

व्हिडिओ पाहा –

सचिन-कांबळीच्या करामतीने गांगुलीच्या रुममध्ये झालेलं पाणीच पाणी| Sachin-Kambli Prank on Ganguly

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---