---Advertisement---

विराट आणि रोहित दक्षिण आफ्रिकेत जाऊनही एकत्र खेळणार नाही? नक्की काय आहे कारण, वाचा

On: मंगळवार, डिसेंबर 14, 2021 12:16 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये लवकरच वनडे आणि कसोटी मालिकेचा थरार रंगणार आहे. १६ डिसेंबर रोजी भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. या मालिकेत सुरुवातीला ३ कसोटी सामन्यांची मालिका पार पडणार आहे. त्यानंतर ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडणार आहे. या मालिकांपासून रोहित शर्मा याला कसोटी संघाचे उपकर्णधारपद, तर वनडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. परंतु, तो आता दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर झाला आहे, तर विराट कोहली याच्याबाबत देखील मोठी बातमी समोर आली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, विराट कोहलीने दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेतून माघार घेतली आहे. विराट कोहलीने या मालिकेसाठी उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे. जर असे झाले तर विराट कोहलीला रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळण्यासाठी आणखी काही वेळ वाट पाहावी लागू शकते. तसेच रोहित कसोटी आणि विराट वनडे मालिका खेळणार नसतील तर, दक्षिण आफ्रिकेत जाऊनही हे दोघे एकत्र खेळताना मात्र दिसणार नाहीत. 

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेला २६ डिसेंबर पासून सुरुवात होणार आहे. कसोटी संघाचे कर्णधारपद विराट कोहलीकडेच असणार आहे, तर वनडे संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने कसोटी मालिकेसाठी १८ सदस्यीय खेळाडूंची घोषणा केली होती. त्याचवेळी विराट कोहलीला वनडे संघाच्या कर्णधार पदावरून काढून टाकण्याचा निर्णय देखील घेण्यात आला होता.

असा आहे दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताचा १८ सदस्यीय खेळाडूंचा कसोटी संघ : विराट कोहली (कर्णधार), प्रियांक पांचाल, केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टिरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.

असे आहे दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत मालिकेचे वेळापत्रक 
कसोटी मालिका :
पहिला कसोटी सामना: २६-३० डिसेंबर २०२१ (सेंच्युरियन)
दुसरा कसोटी सामना : ३-७ जानेवारी,२०२२ (जोहान्सबर्ग)
तिसरा कसोटी सामना: ११-१५ जानेवारी,२०२२ (केपटाऊन)

वनडे मालिका 
पहिला वनडे सामना: १९ जानेवारी,२०२१ (पार्ल)
दुसरा वनडे सामना: २१ जानेवारी,२०२१ (पार्ल)
तिसरा वनडे सामना : २३ जानेवारी, २०२१( केप टाऊन)

महत्वाच्या बातम्या :

‘अरे माझ्या कॉलेजच्या नोट्सही त्यातच राहिल्या…’, विमानात सामान विसरलेल्या क्रिकेटपटूचं आयसीसीकडे गाऱ्हाणं

माजी सलामीवीराने निवडली ‘टेस्ट टीम ऑफ द इयर’; चार भारतीयांना मिळाली जागा

चिंतेचा डोंगर डोक्यावर घेऊन साहा खेळला न्यूझीलंडविरुद्धची मालिका; वाचा काय घडलेले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---