भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा कसोटी सामना सध्या पोर्ट ऑफ स्पेनमध्ये खेळला जात आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता. अशात दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडीजलाने विजय मिळवला नाही, तर त्यांना मालिकेत पराभव स्वीकारावा लागेल. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात खेळला जाणारा हा 100वा कसोटी सामना आहे, ज्यात विराट कोहली आणि सुनील गावसकर यांनी दिग्गजांमध्ये खास योगायोग साधला आहे.
भारत आणि वेस्ट इंडीज (IND vs WI) यांच्यातील 100व्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात भारताने मोठी धावसंख्या केली आहे. उभय संघातील 50वा कसोटी सामना 1983मध्ये खेळला गेला होता. सुनील गावसकर (Sunil Gavaskar) आणि दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) यांनी या सामन्यात शतके ठोकली होती. पण सामना अनिर्णित राहिला होता. गावसकरांनी पहिल्या डावात 128 चेंडूत 121 धावा केल्या होत्या, तर दिलीप वेंगसरकरांनी 238 चेंडूत 159 धावांची खेळी केली होती.
विषेष म्हणजे उभय संघांतील 100व्या कसोटी सामन्यात आता विराट कोहली (Virat Kohli) यानेही 121 धावांची खेळी केली आहे. त्याहून खास गोष्ट ही आहे की, वेस्ट इंडीजविरुद्धच्या 50व्या कसोटीत गावसकरांनी आपेल 29वे कसोटी शतक केले होते आणि विराटनेही शुक्रवारी (21 जुलै) आपले 29वे कसोटी शतक ठोकले. विराटच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे 76वे कसोटी शतक ठरले आहे.
दरम्यान, पोर्ट ऑफ स्पेनवर सुरू असलेल्या भारत-वेस्ट इंडीज यांच्यातील 100व्या कसोटीत विराटने शतक केलेच. पण त्याव्यतिरिक्त सलामीवीर यशस्वी जयस्वाल (57), कर्णधार रोहित शर्मा (80), रविंद्र जडेजा (61) आणि रविचंद्रन अश्विन (56) यांनी पहिल्या वैयक्तिक अर्धशतके केली. परिणामी पहिल्या डावात भारताची धावसंख्या 438 पर्यंत पोहोचली. दुसऱ्या दिवसाखेरवेस्ट इंडीजने 41 षटकांमध्ये एक बाद 86 धावा केल्या आहेत. क्रेग ब्रॅथवेट (37*) आणि किर्क मॅकेंजी (14*) खेळपट्टीवर कायम आहेत. (Virat Kohli and Sunil Gavaskar achieved a special coincidence against West Indies)
महत्वाच्या बातम्या –
Video – चपळता दाखवणे विराटच्या अंगलट, 121 धाावांवर खेळत असताना अल्झारीच्या सुपर थ्रोने केला घात
अमेरिकेत घोंगावलं रसेल नावाचं वादळ! 6 सिक्स मारत चोपल्या 70 धावा, तरीही संघावर पराभवाची नामुष्की