विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा यांना मंगळवारी (10 जानेवारी) नवीन वर्षाची सुरुवात धमाकेदार प्रदर्शानाने केली. रोहित शर्मा या सामन्यात शतकापासून 17 धावा दूर असताना बाद झाला. पण विराटने मात्र कारकिर्दीतील 73 वे आंतरराष्ट्रीय शतक केले. रोहित आणि विराटसह सलामीवीर शूबमन गिल यानेही अर्धशतकीय योगदान दिले. फलंदाजांचा दापडतोड प्रदर्शनाच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 373 धावा कुटल्या. शतकीय खेळीनंतर विराटच्या नावावर असणाऱ्या विक्रमांची संख्या काही अंकांनी नक्कीच वाठली.
विराटने या सामन्यात काही महत्वाचे विक्रम नावावर केले असून यातील एक महत्वाच्या विक्रमात त्याने सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) भारतीय संघाचा महान फलंदाज आहे, पण श्रीलंकेविरुद्धच्या वनडे फॉरमॅटमध्ये विराट कोहली याने शतकांच्या बाबतीत सचिनला मागे टाकले. श्रीलंकेविरुद्ध वनडे फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांचा विचार केला, तर विराट कोहली (Virat Kohli) या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. यापूर्वी विराट आणि सचिन दोघांच्या नावावर श्रीलंकेविरुद्ध प्रत्येकी आठ-आठ वनडे शतकांची नोंद होती.
परंतु, मंगळवारी विराटने सचिनला मागे टाकले. सचिन त्याने श्रीलंकेविरुद्ध वनडे कारकिर्दीत केलेल्या 8 शतकांसह आता या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. तर विराट ९ शतकांसह पहिल्या क्रमांकावर आहे. यादीत तिसरा क्रमांकावर पाकिस्तानचा सईद अनवर आहे, ज्याने या फॉरमॅटमध्ये श्रीलंकेविरुद्ध 7 शतके केली आहेत. चौथ्या क्रमांकावर गौतम गंभीर, पाचव्या क्रमाकंवार रोहित शर्मा आणि सहाव्या क्रमांकावर एडम गिलक्रिस्ट यांची नावे आहेत. गंभीर, रोहित आणि गिलक्रिस्ट यांनी प्रत्येकी 6-6 शतके केली आहेत.
श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक वनडे शतके करणारे फलंदाज
9 – विराट कोहली
8 – सचिन तेंडुलकर
7 – सईय अनवर
6 – गौतम गंभीर
6 – रोहित शर्मा
6 – एडम गिलक्रिस्ट
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा विचार केला, तर खेळपट्टी फलंदाजीसाटी अनुकूल होती. रोहित शर्माने 83 धावांची महत्वापूर्ण खेळी केली. सलामीवीर शुबमन गिलने 70, तर विराट कोहलीने 87 चेंडूत 113 धावा कुटल्या. विराटच्या वनडे कारकिर्दीतील हे 45 वे शतक होते. (Virat Kohli became the batsman with the most ODI centuries against Sri Lanka, surpassing Sachin Tendulkar)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रुकच ठरला भारी! डिसेंबर 2023 चा आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार केला नावे; महिलांत…
सूर्या आणि ईशानला ड्रॉप केल्यामुळे संतापले चाहते, सोशल मीडियावर रोहितसह संघ व्यवस्थापनावर जोरदार टीका