---Advertisement---

विराटने जेव्हा आपल्या टीममेटला इन्स्टाग्रामवर केले होते ब्लॉक; खुद्द अष्टपैलूचा खुलासा

On: मंगळवार, ऑक्टोबर 29, 2024 10:52 PM
Glennn-Maxwell-And-Virat-Kohli
---Advertisement---

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) हा जगातील महान खेळाडूंपैकी एक आहे. विराट कोहलीला करोडो लोक सोशल मीडियावर फॉलो करतात. पण आता विराट कोहलीबाबत नवा खुलासा झाला आहे. विराटने आपल्या एका संघ सहकाऱ्याला इंस्टाग्रामवर ब्लॉक केले होते. पण आता ते चांगले मित्र आहेत. आम्ही बोलत आहोत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलबद्दल, ज्याने स्वतः हा धक्कादायक खुलासा केला आहे.

विराट कोहलीला स्लेजिंग सहन होत नव्हती
जरी ग्लेन मॅक्सवेल आयपीएलमध्ये विराट कोहलीसोबत खेळत असला तरीही दोन्ही खेळाडू आपापल्या देशासाठी खेळायला येतात तेव्हा मैत्रीला प्राधान्य दिले जात नाही. विराटची मैत्री सर्वश्रुत असली तरी त्याला रागही इतका आहे की तो आपल्या संघातील खेळाडूंनाही सोडत नाही. विराटने ग्लेन मॅक्सवेलसोबत असेच काही केले होते, कारण त्याने सामन्यादरम्यान कोहलीला स्लेज करण्याचा प्रयत्न केला होता. त्याने कोहलीच्या खांद्याच्या दुखापतीची खिल्ली उडवली होती.

मॅक्सवेलने खुलासा केला
ग्लेन मॅक्सवेलने LiSTNR स्पोर्ट पॉडकास्टवर विराटबद्दल सांगितले की, ‘मी जेव्हा आरसीबीमध्ये आलो तेव्हा विराट हा पहिला व्यक्ती होता ज्याने मला मॅसेज केला होता. जेव्हा मी आयपीएलच्या प्री-सीझन प्रशिक्षण शिबिरासाठी आलो तेव्हा मी इन्स्टाग्रामवर कोहलीचा शोध घेतला होता, पण त्याची प्रोफाइलच मला सापडली नाही. मी स्तब्ध झालो होते, मग कोणीतरी मला माहिती दिली की जर कोहलीचे अकाउंट सापडत नसेल तर याचा अर्थ असा आहे की त्याने तुम्हाला ब्लॉक केले आहे.’

विराटने का ब्लॉक केले होते?
मॅक्सवेल पुढे म्हणाला, ‘यानंतर मी कोहलीला विचारले की तू मला इंस्टाग्रामवर ब्लॉक केले आहेस का? कोहली म्हणाला, हो, कदाचित तू कसोटी सामन्यात माझी चेष्टा केली होती. मग मी म्हणालो कि ठीक आहे आता अनब्लॉक कर आणि आम्ही चांगले मित्र झालो.’

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएल 2025 लिलावापूर्वी कोणत्या संघाकडे किती पैसे शिल्लक? ‘हा’ संघ पहिल्या क्रमांकावर

‘या’ स्टार खेळाडूला संघातून वगळल्यानंतर निवडकर्त्यांवर भडकले गावसकर, म्हणाले…
BGT; ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी निवडकर्त्याला झाली कोहली-पुजाराच्या जोडीची आठवण! म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---