भारताचा दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये परतल्याचे दिसत आहे. विराटने आशिया चषक 2022 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध खेळताना शतकांचा दुष्काळ संपवला आणि तेव्हापासून एका नव्या अंदाजात खेळताना दिसत आहे. भारताला मंगळवारी (20 सप्टेंबर) ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला टी-20 सामना खेळायचा आहे. तत्पूर्वी विराटने फलंदाजीसोबतच गोलंदाजीत देखील हात आजमावण्याचे ठरवले आहे, असेच दिसते.
ऑस्ट्रेलिया संघ तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आला आहे. उभय संघातील पहिला सामना 20 सप्टेंबर रोजी मोहालीमध्ये खेळला जाईल. आगामी टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्वाची ठरणार आहे. विराट कोहली (Virat Kohli) याच्याकडून चाहत्यांना आशिया चषकाप्रमाणेच चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेआधी विराट कोहली गोलंदाजीचा सराव करताना दिसला. सराव सत्रातील त्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
पंजाब क्रिकेट असोसिएशन (पीपीए) यांनी त्यांच्या ट्वीटर खात्यावरून विराटचे हे फोटो शेअर केले आहेत. टी-20 मालिकेतील हा पहिला सामना मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळला जाईल. विराटने या स्टेडियवर अंदाजे 30 मिनिट गोलंदाजीचा सराव केल्याचे दिसले. यादरम्यान त्याने क्रॉस लेग एक्शनमध्ये गोलंदाजी केली. त्याच्या या सराव सत्रानंतर असे मानले जात आहे की, तो ऑसट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेल गोलंदाजी करताना दिसू शकतो.
Look who’s opening bowling tomorrow 🤪 #IndvsAus @imVkohli @BCCI #viratkohli #virat #kohli #cricket #fans #TeamIndia #India pic.twitter.com/bR2W9mqZD9
— Punjab Cricket Association (@pcacricket) September 19, 2022
आशिया चषकातही केलेली चांगली गोलंदाजी –
त्याने नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक 2022 मध्ये हाँगकाँगविरुद्ध गोलंदाजी केली होती. तब्बल सहा वर्षांनंतर विराट एखाद्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात गोलंदाजी करत होता. त्याला गोलंदाजी करताना पाहून चाहत्यांचीही मने सुखावली होती. यास सामन्यात विराटने 6 धावा खर्च करत संघासाठी किफायतशीर षटक टाकले होते. आतापर्यंत खेळलेल्या 101 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये विराटने गोलंदाजाच्या रूपात एकूण 4 विकेट्स घेतल्या आङेत. हाँगकाँगविरुद्धच्या सामन्याआधी त्याने 2016 साली अखेरचे षटक टाकले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
श्रीलंका क्रिकेटमध्ये पुन्हा खळबळ! विश्वचषकाच्या तोंडावर दिग्गजाला दिला नारळ
वाढदिवस विशेष: राशिद खान विषयी माहित नसलेल्या ५ खास गोष्टी
दक्षिण आफ्रिकेतही आयपीएलची ‘ग्लॅमर गर्ल’ काव्याचा जलवा; सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रियांना उधाण