भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला चुकीचे ठरवत भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत इंग्लंड संघाचा डाव २०५ धावांवर संपवला होता. परंतु भारतीय फलंदाजांना अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. त्यातही कर्णधार विराट कोहली अवघ्या शून्य धावेवर माघारी परतला.
चौथ्या सामनाच्या पहिल्याच दिवशी मोहम्मद सिराजने टाकलेल्या बाउन्सर चेंडू नंतर बेन स्टोक्स आणि विराट कोहली यांच्यात शाब्दिक युद्ध होताना पाहायला मिळाले होते. अशातच आज (०५ मार्च) कोहली फलंदाजीला आल्यानंतर २७ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर स्टोक्सने चोख प्रत्युत्तर देत कोहलीला भोपळाही न फोडता माघारी पाठवले आहे.
स्टोक्सने कोहलीला ऑफ साईडच्या दिशेने चेंडू टाकला. तो चेंडू बाहेरच्या दिशेने बॅटची कडा घेत यष्टीरक्षक बेन फोक्सच्या हातात गेला आणि कोहली बाद झाला. त्यामुळे अवघे ८ चेंडू खेळत खाते न खोलता विराट पव्हेलियनला परतला.
नकोशा विक्रमाची केली बरोबरी
या मालिकेत स्टोक्सने कोहलीला दुसऱ्यांना बाद केले आहे. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून कोहली आठ वेळा शून्यावर बाद झाला आहे. याबाबतीत त्याने माजी कर्णधार एमएस धोनीची बरोबरी केली आहे. तसेच मायदेशात खेळतांना कोहली २०१४ नंतर दुसऱ्यांदा ० धावांवर बाद झाला आहे.
https://twitter.com/SChidamalwad/status/1367735438941720579?s=20
https://twitter.com/cricketfanvideo/status/1367707492780703744?s=20
भारतीय संघ बॅकफूटवर
पहिल्याच दिवशी भारतीय संघाने उत्कृष्ट गोलंदाजी करत इंग्लंड संघाचा डाव २०५ धावांवर संपवला होता. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या शुबमन गिल याला जेम्स अँडरसनने ० धावांवर बाद केले. दिवसाखेर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा हे दोघेही फलंदाजी करत होते. त्यानंतर दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात भारतीय संघाने चार मुख्य फलंदाज गमावले आहेत. रोहित शर्मा एकतर्फी झुंज देत आहे, तर दुसरीकडे चेतेश्वर पुजारा अवघ्या १७ धावा करत बाद झाला. विराट कोहली शून्य धावा करत माघारी परतला. तसेच अजिंक्य रहाणे याने २७ धावांची खेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटी चॅम्पियनशिपमध्ये रोहितचा डंका, कोणालाही न जमलेल्या विक्रमाला घातली गवसणी
हिटमॅनचा एकहजारी विक्रम! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा फक्त दुसराच, पाहा पहिलं नाव
INDvsENG: ही आयुष्यातील सर्वात कठीण टेस्ट सीरिज; बेन स्टोक्सचं मोठ विधान