---Advertisement---

या कारणामुळे विराट कोहली होता चिंतेत…

---Advertisement---

आयपीएलच्या 12 व्या मोसमाला रंगतदार सुरुवात झाली आहे. मात्र रविवारी भारताचा आणि मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त झाला. त्याला दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करताना खांद्याची दुखापत झाली आहे.

या सामन्यात दिल्लीच्या डावातील शेवटचा चेंडू टाकताना बुमराह ही दुखापत झाली आहे. बुमराहने पहिल्या इंनिंगचा अंतिम चेंडू पंतला यॉर्कर टाकला. पंतने या चेंडूला सरळ खेळला यावेळी तो चेंडू आडवण्याच्या प्रयत्नात बुमराहने स्वतःला झोकून दिले. याचमुळे त्याच्या खांद्याला दुखापत झाली.

त्यानंतर खेळाडूंबरोबरच संघाचे फिजियो सुद्धा मैदानावर आले, फिजियोच्या मदतीने बुमराह उठून मैदानाबाहेर गेला. पण चांगली गोष्ट अशी की बुमराची दुखापत गंभीर स्वरूपाची नाही. मात्र त्याच्या फिटनेसबाबत संघव्यवस्थापनाने सावधगिरी बाळगण्यासाठी त्याला मुंबई इंडियन्सकडून फलंदाजीसाठी पाठवण्यात आले नाही.

त्याच्या या दुखापतीबद्दल सुत्रांकडून आलेल्या माहितीनुसार संघाच्या हॉटेलपर्यंत पोहचण्याच्या कालावधीपर्यंत तो ठीक झाला होता. सुत्राने सांगितले की ‘तो फिट असून त्याचा फक्त खांदा दुखावला गेला होता. तो भारतीय संघातील आणि मुंबई इंडियन्सचा महत्त्वाचा भाग आहे. तसेच विश्वचषकही जवळ येत आहे. त्यामुळे संघव्यवस्थापनाने विचार केला की त्याला रविवारी झालेल्या सामन्यात फलंदाजीला पाठवू नये.’

बुमराहच्या या दुखापतीमुळे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापकही चिंतेत होते. भारतीय संघाचे फिजिओ पॅट्रीक फऱ्हाट यांनी मुंबई इंडियन्सचे फिजिओ नितीन पटेल यांना सोमवारी सकाळी बुमराहच्या फिटनेस संबंधी चौकशीसाठी संपर्कही साधला होता.

याबद्दल माहिती देताना सुत्राने सांगितले की ‘सर्वजण चिंतेत होते. पॅट्रिक हे नितीनशी सोमवारी सकाळी बोलले आहेत. बुमराह हा आयपीएलनंतर मेमध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषकासाठी जाणाऱ्या भारतीय संघाचा महत्त्वाचा भाग आहे. पण काळजी करण्याची गरज नाही. तो पुढच्या सामन्यात खेळण्याची दाट शक्यता आहे.’

आयपीएलच्या आधी विराटने भारतीय खेळाडूंना हुशारीने खेळ करा आणि विश्वचषकाची संधी गमावू नका असा सल्ला दिला होता. तसेच त्याने सांगितले होते की भारतीय संघाचे फिजिओ पॅट्रिक यांच्या संपर्कात रहा.

महत्त्वाच्या बातम्या-

ऑलम्पिक इतिहासात पहिलांदाच उघडणार ‘इंडिया हाऊस’..

पहिल्याच सामन्यात खेळताना जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त…

क्षेत्ररक्षण करताना राहुल तेवतीयाचा अनोखा पराक्रम,या दिग्गजांच्या यादीत झाला समावेश

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment