---Advertisement---

‘या’ नकोशा यादीतही ‘कर्णधार’ विराटचे धोनीच्या पावलावर पाऊल

On: शुक्रवार, मार्च 5, 2021 4:04 PM
---Advertisement---

अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात नरेंद्र मोदी स्टेडियमवर चौथा आणि शेवटचा कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात भारतीय फलंदाज इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर संघर्ष करताना दिसत आहेत. त्यातच भारताचा कर्णधार विराट कोहली पहिल्या डावात शुन्यावर बाद झाला. याबरोबर त्याने एका नकोशा यादीत एमएस धोनीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

विराट पहिल्या डावात २७ व्या षटकात बेन स्टोक्सच्या गोलंदाजी विरुद्ध ८ चेंडूत शुन्य धावेवर बाद झाला. कसोटी कर्णधार म्हणून सर्वाधिकवेळा शुन्यावर बाद होण्याची ही त्याची आठवी वेळ होती.  त्यामुळे त्याने भारताचा कसोटी कर्णधार म्हणून सर्वाधिकवेळा शुन्य धावेवर बाद होण्याच्या धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. धोनी देखील कसोटी कर्णधार म्हणून आठ वेळा शुन्यावर बाद झाला आहे.

कसोटीत सर्वाधिकवेळा शुन्यावर बाद होणारे भारतीय कर्णधार 
८ – एमएस धोनी
८ – विराट कोहली
७ – मन्सुर अली खान पतौडी
६ – कपिल देव

‘हे’ कर्णधार झालेत सर्वाधिक वेळा शुन्यावर बाद 

कसोटीमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिकवेळ शुन्यावर बाद होण्याचा जागतिक विक्रम न्यूझीलंडचे माजी कर्णधार स्टिफन फ्लेमिंग यांच्या नावावर आहे. ते १३ वेळा शुन्यावर बाद झाले आहेत. तसेच त्यांच्या पाठोपाठ ग्रॅमी स्मिथ असून तो १० वेळा कर्णधार म्हणून शुन्यावर बाद झाला आहे.

यानंतर या यादीत क्रमांक लागतो तो माईक आर्थरटन, हन्सी क्रोनिए, एमएस धोनी आणि विराट कोहली. हे चौघेही प्रत्येकी ८ वेळा कसोटीत नेतृत्व करताना शुन्यावर बाद झाले आहेत.

विराटची शुन्यावर बाद होण्याची १२ वी वेळ

विराट त्याच्या कसोटी कारकिर्दीत ९१ वा कसोटी सामना खेळताना एकूण १२ व्यांदा शुन्यावर बाद झाला आहे. त्यामुळे सध्या भारतीय  संघात खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये तो सर्वाधिकवेळा कसोटीत शुन्यावर बाद होणारा इशांत शर्मा नंतरचा दुसराच फलंदाज आहे. इशांत ३२ वेळा शुन्यावर बाद झाला आहे.

विराट सर्वाधिक कसोटीत नेतृत्व करणारा भारतीय कर्णधार

विराटचा हा कर्णधार म्हणून ६० वा कसोटी सामना आहे. त्यामुळे त्याने भारताकडून सर्वाधिक कसोटी सामन्यात नेतृत्व करणाऱ्या कर्णधारांच्या यादीतही धोनीची बरोबरी केली आहे. धोनीनेही ६० कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

विराटच्या शतकांचा दुष्काळ संपेना ! ‘इतके’ सामने झाले नाही उंचावली बॅट

विराट आणि शून्य! कसोटीत ‘इतक्यांदा’ कोहली भोपळाही न फोडता झालाय बाद

विराटचा जुळा भाऊ आला अहमदाबाद कसोटी पाहायला? फोटो पाहून तुम्हीही गोंधळात पडालं

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---